<div class="paragraphs"><p>Bhandara Zilla Parishad</p></div>

Bhandara Zilla Parishad

 

Sarkarnama

विदर्भ

भंडारा जिल्हा परिषद निवडणूक : दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : भंडारा जिल्हापरिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरूवात झाली. सकाळी अतिशय संथ सुरू झालेले मतदान सूर्य चढू लागला तसतसे वाढायला लागले. दुपारनंतर मतदानाने वेग पकडला आणि आतापर्यंत ४५ टक्क्यांच्या जवळपास मतदान झालेले आहे.

कालपासून विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. तापमान ७.६ अंश सेल्सिअसपर्यत घसरले आहे. कडाक्याच्या थंडीने भंडारा जिल्ह्यात (Bhandara District) मतदार सकाळी मतदानाला बाहेर पडलेच नाही. थंडी जसजशी कमी होऊ लागली, तसतसे लोक मतदानासाठी बाहेर पडताना दिसले. सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरूवात झाल्यानंतर ९.३० वाजेपर्यंत फक्त ४.६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर प्रक्रियेने थोडा वेग पकडला. ११.३० वाजेपर्यंत टक्केवारी १५.५८ पर्यंत पोहोचली. प्रशासनाने जारी केलेल्या माहितीनुसार दुपारी १.३० वाजेपर्यंत ३२.९९ टक्के मतदान झाले होते.

दुपारी ३.३० वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी प्रशासनाकडून अद्याप जारी करण्यात आलेले नाही. परंतु सद्यस्थितीपर्यंत ४५ ते ४७ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येते आहे. ही टक्केवारी ५५ ते ६० टक्क्यांपर्यंच पोहोचण्याचे संकेत मिळत आहेत. भंडारा तालुक्यासह तुमसर, मोहाडी, साकोली, लाखनी, पवनी आणि लाखांदूर तालुक्यात जवळपास सारख्या गतीने प्रक्रिया सुरू आहे. याच दिवशी तीन नगरपंचायतींसाठीही मतदान सुरू आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण जाणवतो आहे. आकडेवारी प्रसिद्ध करण्यासाठी अवधी लागत असल्यामुळे बरेच जण ताटकळताना दिसले.

दुपारी १.३० वाजेपर्यंत तुमसर तालुक्यात ३१.१९ टक्के मतदान झाले, मोहाडी तालुक्यात २६.१८, साकोली ३४.३८, लाखनी ३३.८५, भंडारा ३४.९४, पवनी ३४.०२ तर लाखांदूर तालुक्यात ३७.०९ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मतदानाचा टक्का कमी असल्यामुळे दुपारनंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदान वाढवण्यासाठी सरकारवल्याचे चित्र काही तालुक्यांमध्ये बघायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT