Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra 
विदर्भ

Bharat Jodo Yatra: भाजपच्या मनातील भारत आम्ही होऊ देणार नाही ; राहुल गांधीचे थेट आव्हान

अनुराधा धावडे, अतुल मेहेरे

Bharat Jodo Yatra शेगाव : आज भारतातील प्रत्येक माणूस भयभीत आहे. शेतकरी, विध्यार्थी, नोकरदारांच्या मनात द्वेषभवाना निर्माण करून त्यांना जात, धर्माच्या नावावर विभाजित करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. सर्व उद्योग आपल्या चारदोन मित्रांच्या हाती देऊन एकाधिकारशाही निर्माण केली जात आहे. असा भारत (India) आम्हला नको आहे आणि तो आम्ही होऊ दिला जाणार नाही, असे थेट इशारा राहुल गांधी यांनी शेगावच्या विराट सभेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी यांना दिला.

भारत जोडो यात्रा उद्या शनिवारी विदर्भातून बाहेर पडत आहे. त्या पूर्वी आज शेगाव येथे जाहीर सभा घेण्यात आली. सभेला मुकण वासनिक, अविनाश पांडे, नाना पाटोळे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेत थोरात, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राष्ट्रवादीचे राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, खासदार बाळू धानोरकर, आमदार विकास ठाकरे, आमदार सुनील केदार, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार राजू पारवे, आमदार यशोमती ठाकूर, माझी आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्यासह् सर्व आमदार, पदधिकारी या वेळी उपस्थित होते.

राहुल गांधी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, येथील संत महात्मे यांनी कधीच कोणाचा द्वेष केला नाही. उलट सबका मलिक एक असा संदेश दिला. तोच संदेश घेऊन आम्ही भारत जोडो यात्रा घेऊन निघालो आहोत. आम्ही वेगळे काही सांगत नाही.

पण शेतकऱ्यांसाठी एवढेच करा मोदीजी

यात्रेरम्यान आपल्याला शेकडो शेतकरी भेटले. सर्वच दुखी होते. शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. पंतप्रधान् मोदी आणि मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा. म्हणजे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असे या वेळी राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस आघाडीच्या कार्यकाळात आम्ही विदर्भातील शेतकऱ्याचा आवाज ऐकून पॅकेज दिले होते. तेव्हा आत्महत्या थांबल्या होत्या. आता त्या परत सुरु झाल्या आहेत. धो धो पाऊस पडून नकुसान् झाल्याचे दिसत असतानाही विमा कंपन्या भरपाई देत नाही या कडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.

तोडणारे लवकर संपतात तर जोडणारे आजीवन टिकतात असे सांगून नाना पाटोले यांनी भाजपचा शेवट जवळ आल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही अभूतपूर्व सभा असल्याचे सांगून सत्ता परिवर्तनाचे संकेत देत असल्याचे सांगितले. तर, शेगावच्या भूमीवर एवढी विराट सभा आपण या पूर्वी बघितली नाही. भारत जोडो यात्रेचा ज्या दिवशी काश्मीरमध्ये तिरंगा फडकेल त्या दिवसापासून भाजपच्या अस्ताला सुरुवात होईल, असे भाकितही वर्तवले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT