Bhaskar Jadhav and Nitesh Rane
Bhaskar Jadhav and Nitesh Rane Sarkarnama
विदर्भ

Bhaskar Jadhav : भास्कर जाधव संतापले; म्हणाले, आमदार राणेंना काही शिकवा हो...

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्‍न आज सभागृहात चांगलाच गाजला. कोकणच्या सर्व आमदारांनी हा प्रश्‍न लावून धरला. भास्कर जाधव या प्रश्‍नावर आक्रमक झालेले बघायला मिळाले. आम्‍ही अधिकाऱ्यांना म्हणजेच सरकारला विचारून विचारून थकलो, पण उत्तर तेच आहे आणि तेच राहणार आहे, असे आमदार भास्कर जाधव म्हणाले.

रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी नुकताच या खात्याचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांच्या आम्ही जास्त भार देणार नाही. नाहीतरी त्यांना कितीही प्रश्‍न विचारले तरी उत्तर मात्र तेच राहणार आहे. आम्ही विचारून विचारून थकलो पण अधिकारी आणि मंत्री तेच उत्तर देत आहेत आणि तेच देत राहणार आहेत. रस्त्याच्या कामा कोर्ट-कचेऱ्या सुरू असल्याचे सांगण्यात येते. पण ही स्थिती मुंबई (Mumbai) ते गोवा (Goa) पर्यंत नाही, तर केवळ पनवेल ते इंदापूर येवढ्याच भागात असल्याचे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितले.

न्यायानयीन प्रकरणे पनवेल ते इंदापूर येवढ्याच अंतराच्या कामात आहे, बाकी ठिकाणी नाहीये, असे सांगताना आता मुंबईतील चाकरमाने गणपती उत्सवाकरिता कोकणाचे वाट धरणार आहे. म्‍हणून त्यांचा प्रवास कसा सुसह्य होईल, हे आता मंत्रिमहोदयांनी सांगावे. आपण त्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी कधी जाणार आहात असा प्रश्‍न भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. हे बोलत असताना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) मध्येच बोलले आणि ते बसूनच बोलले. त्यांचाही चांगलाच समाचार जाधव यांनी घेतला.

तुमची अडीच वर्ष फुकट गेली, असा टोला भास्कर जाधव बोलत असताना आमदार नितेश राणे यांनी लगावला. यावर जाधव संतापले आणि अजित पवारांपासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा उल्लेख आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, मग चंद्रकांत दादाही ५ वर्ष या खात्याचे मंत्री होते. मग त्यांची ५ वर्ष फुकट गेली, नितीन गडकरींची १० वर्षे फुकट गेली, असा म्हणायचे काय, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी आमदार राणेंना केला. ‘त्यांना’ काहीतरी शिकवा, अशी सुचनाही त्यांनी विधानसभा अध्यक्षांना केली.

मुंबई - गोवा मार्गावरील परशुराम घाट आत्ताच नाही, तर नेहमीच अडचणीचा राहणार आहे. त्यासाठी दुसऱ्या गावांतून नवीन रस्ता काढता येऊ शकतो. त्यासाठी सरकार प्रयत्न करणार हे का, असा प्रश्‍न भास्कर जाधव यांनी केला. त्यावर सर्वांच्या सुचनांचे पालन केले जाईल आणि २५ ऑगस्टपर्यंत या रस्त्यावरील खड्डे बुजले पाहिजे, असा प्रयत्न आहे. त्यानंतर आपण सर्वजण जाऊन पाहणी करू, असे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

या रस्त्याबाबत बोलताना राजन साळवी म्हणाले, मुंबई गोवा मार्ग पूर्ण व्हावं हे जनतेचे स्वप्न होते. केंद्र आणि राज्य सरकार मिळून एकुण १० टप्प्यांमध्ये या रस्त्याचे काम करणार होते. वाकड ते पनवेलचे हा रस्ता होता तसाच आहे, त्यात काहीही सुधारणा नाही. या अंतराच्या प्रवासाला २ तास लागायला पाहिजे, पण आता ५ तास लागतात. लोकांना जागेचा मोबदला मिळणार का? लवादाचे निर्णय होणार का? संयुक्त दौरा करूऩ प्रश्‍न निकाली निघणार का, आदी प्रश्‍न साळवी यांनी उपस्थित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT