Bhavana Gawali Sarkarnama
विदर्भ

Bhavana Gawali News : तिकीट कापल्याची मोठी खंत, आता मात्र...; गवळींनी थेट 'भावना'च व्यक्त केल्या

Lok Sabha Election 2024 : मै मेरी झाँशी नहीं दूँगी म्हणत खासदार भावना गवळी यवतमाळ-वाशीम मतदारसंघासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र, वरिष्ठ स्तरावर झालेल्या निर्णयामुळे गवळींचे तिकीट कापण्यात आले.

Sunil Balasaheb Dhumal

Yavatmal - Washim Political News : माझे तिकीट कापल्याने खंत वाटली मात्र मी नाराज नाही, असे म्हणत खासदार भावना गवळींनी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री पाटील यांची प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. शिवसेनेसाठी 1985 पासून वडिलांनी काम केले आहे. मलाही मतदारसंघातील लोकांनी साथ दिली आहे. त्यामुळे मी वेगळा कुठलाही पक्षाविरोधात जाण्याचा विचार करणार नाही. नरेंद्र मोदींना Narendra Modi तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचेही गवळींनी स्पष्ट केले.

Bhavana Gawali assure that campaign for Narendra Modi.

मै मेरी झाँशी नहीं दूँगी म्हणत खासदार भावना गवळी Bhavana Gawali यवतमाळ-वाशीम मतदारसंघासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र, वरिष्ठ स्तरावर झालेल्या निर्णयामुळे गवळींचे तिकीट कापण्यात आले. परिणामी नाराज झालेल्या गवळी तेथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही सभेला उपस्थित राहिल्या नाहीत. आता मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री शिंदेंना यश आल्याचे बोलले जाते. त्यानंतर पत्रकार परिषद घेत गवळींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे राजश्री पाटलांचा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील Hemant Patil आणि यवतमाळच्या खासदार भावना गवळींचे या वेळी तिकीट कापण्यात आले. पाटलांची समजूत त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशीममधून उमेदवारी देऊन काढण्यात आली. मुंबईत तळ ठोकून उमेदवारीसाठी आकाश-पाताळ एक केले. मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले आणि त्यांचा पत्ता कट झाला. त्यामुळेच त्या राजश्री पाटलांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री शिंदेंची Eknath Shinde सभा झाली. त्यावेळी भावना गवळी उपस्थित नव्हता. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आता मात्र गवळींनी स्वतःच पुढे येत महायुतीचे काम करणार असल्याचे जाहीर केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भावना गवळी गेल्या पाच टर्म यवतमाळ-वाशीम Yavatmal Washim Lok Sabha Constituency लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, विद्यमान खासदारांचे मतदारसंघात काम केले नाही, असा आरोप होत आहे. त्यातूनच मला तिकीट नाकारल्याची चर्चा आहे, असे म्हणत भावना गवळींनी 25 वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.

दरम्यान, विदर्भातील राजकारणात गवळींचा दबदबा वाढला होता. त्या आता सहाव्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत होत्या. एकदाही पराभूत न झालेल्या गवळींच्या कारभारावर आता बोट ठेवत भाजपने कडी केल्याचे बोलले जाते. अंतर्गत सर्व्हेचे कारण देत भाजपच्या नेत्यांनीच गवळींचा 'गेम' केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT