नागपूर : जीएसटीचे (GST) रिटर्न भरण्याच्या पद्धतीच्या तरतुदींमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. रिटर्न भरण्याच्या काही तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. या विषयावर बोलताना छगन भुजबळ यांनी सरकारला टोला लगावला.
फडणवीसांना (Devendra Fadanvis) टोला लगावताना भुजबळ (Chagan Bhujbal) म्हणाले, आज मी आनंदी आहे आणि माझ्या आनंदाचे कारणही तसे खास आहे. सध्या दाढीवाल्यांचे महत्व फार मोठे आहे. राज्याला पहिल्यांदा दाढीवाले मुख्यमंत्री (Chief Minister) भेटले आहे. काळ्या दाढीचा प्रभाव राज्यात आहे, तर पांढऱ्या दाढीचा प्रभाव हिंदुस्थानात (India) आहे. त्यांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, तुमचं माहिती नाही. पण आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा सन्मान आहे. थोडा वेळ फडणवीस आणि भुजबळ यांच्यात यावरून प्रश्नोत्तरी झाली.
जीएसटीच्या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, जीएसटीआर १, २, ३ क्रमबद्ध पद्धतीने भरणं गरजेचं होते. अचूक विवरण भरणे गरजेचे होते. पण तेव्हा ते झाले नाही. वस्तू व सेवा कर ३७ ते ४३ कलमांमध्ये तरतूद करण्यात आली आहे. सध्याची पद्धती आहे तशीच सुरू ठेवण्याची शिफारस केलेली आहे. योग्य त्या कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्षांनी विधेयक विचारात घेतले आहे.
भुजबळ म्हणाले, आतापर्यंत जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या. या निर्णयामुळे रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागला आहे. एखादा टॅक्स वाढविल्यास, त्याचा फटका शेवटच्या माणसाला बसतो. दही, पनीर, मध, मखना, मटण या सर्वांवरच जीएसटी लावण्यात आला आहे. केंद्रात जे मंजूर झाले, ते आपण इकडे मंजूर करवून घेताय, असा टोला भुजबळांनी हाणला. भाववाढ इतकी आहे की पेन्सिल खोडरबरवरही जीएसटी लावला आहे. उपमुख्यमंत्र्यांचा दरारा आता केंद्रातही वाढला आहे. त्यामुळे त्यांनी केंद्राकडे मागणी लावून धरून राज्याच्या भल्याचा विचार करावा, असेही ते म्हणाले.
या जीएसटीचा परिणाम इतका झाला की, स्कूल चले हम, जीएसटी के साथ’, अशा घोषणा लोक देताहेत. आपण सांगता की देशात मंदी नाही तर मग या गोष्टींवर जीएसटी लावण्याची गरज काय? श्रीलंका आणि बांगलादेशसारखी स्थिती आपल्या देशात नाही, तर मग ही भाववाढ का? सुब्रमण्यम स्वामींनी सांगितले की भारतीय अर्थव्यवस्था गेल्या वर्षीच अडचणीत सापडली आहे. येवढे ‘चमचे’ असताना चमच्यांवरही तुम्ही टॅक्स लावला, अशा घणाघात भुजबळांनी केला. अन्नधान्य, शाळा, हॉस्पिटलच्या वस्तूंवर जीएसटी लावू नये, असं उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला म्हटलं पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. काला धन वापस आयेगा विकास होगा, असं पंतप्रधान म्हणाले होते. पण तसं काही झालं नाही. उलट अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. आता फक्त भाषणावर जीएसटी लागायचा बाकी आहे, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.