Vijay Wadettiwar, Asawari Devtale And Vijay Devtale Sarkarnama
विदर्भ

Congress : विजय वडेट्टीवार यांना मोठा झटका, चंद्रपूरचे आसावरी व विजय देवतळे काँग्रेसमधून निलंबित

Chandrapur Asawari Devtale and Vijay Devtale suspended from Congress : विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात काम केल्याच्या आलेल्या तक्रारीची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे.

राजेश पाटील - Rajesh Patil

Chandrapur News, 27 June : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आसावरी देवतळे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय देवतळे यांना काँग्रेसने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे विरोधीपक्षनेते विजय वडट्टेवार व त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. स्थानिक पातळीवरून पक्ष कार्यालयात लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार व विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विरोधात काम केल्याच्या आलेल्या तक्रारीची दखल घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे.

काँग्रेसचे (Congress) प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) नाना गावंडे यांनी निलंबनाचा आदेश काढला आहे. चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांना निलंबनाची प्रत पाठवण्यात आली आहे. देवतळे पती-पत्नीचे (Asawari Devtale and Vijay Devtale ) निलंबन हा विजय वडेट्टीवार यांच्या गटासाठी मोठा धक्का मानला जातो.

वडेट्टीवार यांनी सुरुवातीला प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूरवर दावा केला होता. मात्र धानोरकर यांनी आधीच निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता. समाज माध्यमांवरून त्यांनी प्रचारालादेखील सुरुवात केली होती. यावरून वडेट्टीवार आणि धानोरकर समर्थकांमध्ये मोठे मतभेद उफाळून आले होते.

प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर चंद्रपूरचे खासदार होते. त्यांचे अकाली निधन झाले. मागील निवडणुकीत धानोकर हे महाराष्ट्रातून निवडूण आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार होते. प्रतिभा धानोरकर या आमदार होत्या. चंद्रपूर लोकसभेची जागा विजय वडेट्टीवार यांना शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी हवी होती. मात्र, धानोकर यांनी यास काडाडून विरोध केला होता.

वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात दिल्लीपर्यंत स्थानिक कार्यकर्त्यांनी धानोरकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. दिल्लीत जाणाऱ्यांमध्ये देवतळे हेसुद्धा होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यावर ठाम राहिले. धानोरकर यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत केले.

निवडून आल्यानंतर चंद्रपूर येथे झालेल्या सत्कार समारंभात प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या विरोधात कोणी कामे केली त्यांची नावे ठावूक असल्याचे सांगून विरोधकांना सूचक इशारा दिला होता. काँग्रेसच्या जिल्ह्याध्यक्षांना धानोरकर यांचा प्रचार करू नये, असे आपल्याला एका नेत्याने निर्देश दिले होते असे जाहीरपणे सांगून खळबळ उडवून दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT