Crime Branch teams from Mumbai, Nagpur, and Amravati jointly arrest 13 men in Paratwada, Amravati, mistaking them for Bishnoi gang members — later forced to release all. Sarkarnama
विदर्भ

Bishnoi Gang : बिश्नोई गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस मुंबईवरून गेले : 13 जणांना पकडलं अन् लगेच सोडूनही दिलं; नेमकं प्रकरण काय?

Bishnoi Gang : परतवाड्यात बिश्नोई गँगचे सदस्य समजून 13 जणांना अटक करण्यात आली होती. मात्र चौकशीनंतर सर्वांची सुटका करावी लागल्याने तीनही क्राईम ब्रांचवर नामुष्की ओढावली आहे.

Hrishikesh Nalagune

Bishnoi Gang : बिश्नोई गँगचे सदस्य समजून अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातून 13 जणांना गुरुवार (2 ऑक्टोबर) अटक करण्यात आली होती. मुंबई, नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांचने संयुक्तपणे ही कारवाई केली होती. पण चौकशीअंती या सर्वांना सोडून देण्याची नामुष्की तिन्ही शहरांच्या क्राईम ब्रांचवर ओढावली आहे.

नेमकं प्रकरण काय?

परतवाडा इथं लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित आंतरराज्य चोरांची टोळी मोठी घटना घडवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे मुंबई आणि नागपूर गुन्हे शाखेचं पथक अमरावती ग्रामीण पोलिस कार्यालयात गुरूवारी सायंकाळी दाखल झालं. यानंतर अमरावती ग्रामीणच्या गुन्हे शाखेसोबत, दोन्ही पथकं परतवाडा इथं पोहोचली.

परतवाडा इथं पोहोचल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ब्राह्मण सभा कॉलनी आणि कश्यप पेट्रोल पंप परिसरातून 13 जणांना अटक केली. अटक करण्यापूर्वी संशयितांकडे शस्त्र असण्याच्या संशयाने पोलिसांनी हवेत वार्निंग शॉट फायर केला. गुरुवारी रात्री 11 वाजेपर्यंत परतवाडा शहरात हा थरार सुरु होता. शुक्रवारी दिवसभर या 13 जणांची चौकशी करण्यात आली. यात पोलिसांना कुणाल राणा याचा शोध होता.

मात्र चौकशीअंती मुंबई पोलिसांसाठी मोस्ट वाँडेट असलेला कुणाल राणा हा नाहीच, केवळ नामसाधर्मामुळे गफलत झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी या 13 जणांना सोडून देण्याची नामुष्की 3 शहरातील क्राईम ब्रांचवर ओढावली. अमरावती ग्रामीण पोलीसांनी पत्रक काढून ही माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT