नागपूर : राज्यात काही महिन्यांवर पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, मुंबईसह काही महापालिका निवडणुका होत आहेत. त्यासाठी सर्वच पक्षानी कबर कसली आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत नुकत्याच झालेल्या जिल्हापरिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या निकालावरुन अंदाज घेत पक्षप्रमुखांनी रणनिती आखण्यास सुरवात केली आहे.
भाजपनेही महापालिकेच्या आखाड्यात उतरण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याची सूचना दिली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठे नेते, केंद्रीय नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बैठक झाली. नागपूर येथील फडणवीसांच्या घरी गडकरी आणि भाजप कोअर कमिटीच्या सदस्यांची बैठक झाली. नागपूरचे आमदार ,खासदार आजी-माजी महापौर या बैठकीला उपस्थित आहे.
नागपूर महापालिकेच्या निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती सुत्रांनी दिली. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुक भाजपचा कॅाग्रेसने पराभव केला. त्यानंतर या बैठकीत त्याचा आढावा घेण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 गणांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे या सारख्या प्रमुख भाजप नेत्यांचा गड असूनही काँग्रेसनं नागपूरमध्ये जोरदार मुसंडी मारली. नागपूरमध्ये मंत्री सुनील केदार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे. त्यामुळे कॉग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. याच निकालातून धडा घेत भाजप त्या दृष्टीने डावपेच आखत आहे. कुठल्या महापालिकेत किती जागा मिळतील, त्यासाठी काय करायचे याची रणनिती या बैठकीत आखण्यात आली.
'लेडी डॅान' कोण? फ्लेचर पटेलांनी नवाब मलिकांना दिलं उत्तर!
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुन्हा एनसीबीवर (NCB) गंभीर आरोप केले. ''मी आर्यन खानला अटक केल्यानंतर दोन आरोपी कसे हँडल करताय प्रश्न विचारले होते ? एससीबी कार्यालयात जातात कसे याबाबत प्रश्न विचारल्यानंतर एनसीबीने त्याबाबत खुलासा केला होता. फ्लेचर पटेल कोण आहेत? त्यांच्यासोबत झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंचा काय संबंध आहे?'' असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. मलिक याच्या या आरोपाला फ्लेचर पटेल यांनी उत्तर दिलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.