Harshwardhan Sapkal Sarkarnama
विदर्भ

Gen-Z Remark : कंगना राणावतच्या 'गटारछाप' विधानावर काँग्रेसच्या सपकाळांना पूजा शकुन पांडेंची झाली आठवण; 'चिखलात दगड मारल्यावर...'

Harshwardhan Sapkal slams BJP MP Kangana Ranaut over controversial Gen-Z remark, escalating the nationwide political row : Gen-Z ही देशाचे भविष्य असल्याचे सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी कंगना राणावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला; भाजपच्या विचारसरणीवरही निशाणा, पूजा शकुन पांडे प्रकरणाचाही केला उल्लेख.

Pradeep Pendhare

Kangana Ranaut Controversy : भाजपच्या खासदार कंगना राणावत यांनी 'Gen-Z' पिढीबाबत केलेल्या 'गटारछाप' या वक्तव्यावरून देशभरात राजकीय वातावरण तापले आहे.

सोशल मीडियावर या वक्तव्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, महाराष्ट्रातही विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका सुरू केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कंगना राणावत यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपवर थेट निशाणा साधला.

सपकाळ म्हणाले की, "Gen-Z ही देशाची पुढची पिढी असून उद्याच्या भारताचे भविष्य आहे. या पिढीबद्दल असलेला अनादर आणि असूया ही भाजपच्या (BJP) विचारसरणीची देण आहे. धर्माच्या नावावर देश, संस्कृती आणि पुढची पिढी बुडवण्याचे काम सुरू आहे."

कंगना राणावत यांच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत सपकाळ (Harshwardhan Sapkal) म्हणाले, "त्यांच्या स्ट्रगलर ते स्टार या प्रवासाच्या खोलात गेल्यावर अनेक प्रश्न निर्माण होतील. चिखलात दगड मारला तर त्याचे शिंतोडे सर्वांच्या अंगावर उडतात. त्यामुळे तरुणांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी आहे." त्यांनी पुढे आरोप केला की, Gen-Z विषयी व्यक्त करण्यात आलेली तुच्छता ही केवळ वैयक्तिक भूमिका नसून भाजपच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे.

टीका करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी 30 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात घडलेल्या एका वादग्रस्त घटनेची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, अखिल भारतीय हिंदू महासभेच्या नेत्या पूजा शकुन पांडे यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या प्रतिमेवर एअर पिस्तूलने गोळ्या झाडून हत्येचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला होता.

सपकाळ म्हणाले, "आज कंगना राणावत ज्या प्रकारची भाषा वापरत आहेत, त्याच प्रकारची भाषा त्या वेळी पूजा शकुन पांडे वापरत होत्या. आज कपडे भगवे नसतील, पण तीच विकृत मानसिकता भाजपने पुढे आणली आहे. धर्माच्या नावावर देश, संस्कृती आणि पुढच्या पिढीचे नुकसान करण्याचे काम सुरू आहे."

Gen-Z वक्तव्यावरून वाढला राजकीय संघर्ष

कंगना राणावत यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रासह देशभरात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेससह विविध पक्षांकडून भाजपला लक्ष्य केले जात असून, सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसांत या वादावर भाजपकडून अधिकृत भूमिका येते का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT