Anil Bonde
Anil Bonde  Sarkarnama
विदर्भ

विदर्भातील बड्या भाजप नेत्याला न्यायालयाचा दणका! तीन महिन्यांची शिक्षा सुनावली

सरकारनामा ब्युरो

अमरावती : भाजप (BJP) नेते व माजी कृषि मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांना न्यायालयाने दणका दिला आहे. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना तीन महिने शिक्षा व 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वरुडच्या नायब तहसिलदारांना मारहाण केल्याप्रकरणी अनिल बोंडे यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे बोंडे हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत.

वरुडचे न्यायब तहसिलदार नंदकिशोर काळे यांना भाजपचे नेते आणि माजी कृषी मंत्री बोंडेंनी कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली होती. त्यावेळी त्यांना मारहाणही करण्यात आली होती. ही घटना 2017 मध्ये घडली होती. आमदार असताना बोंडे नागरिकांच्या प्रश्नावर आक्रमक झाले होते. यातूनच त्यांनी नायब तहसिलदारांना मारहाण केली होती. या प्रकरणी अखेर सत्र न्यायालयाने बोंडेंना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्यांना तीन महिने कारवास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

अनिल बोंडे कायम वादात

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविषयी अपमानकारक भाषा वापरल्याबद्दल आमदार अनिल बोंडे हे नुकतेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत माझगाव महानगर दंडाधिकाऱ्यांनी आझाद मैदान पोलिसांना चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी बोंडे यांच्यासह नागपूर पूर्व मतदारसंघाचे भाजपा आमदार कृष्णा खोपडे (Krishna Khopde), भाजपा युवा मोर्चा जालनाचे जिल्हाध्यक्ष सुजित जोगस हेही आरोपी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT