Nitin Gadkari at Madhya Pradesh Sarkarnama
विदर्भ

Nitin Gadkari : पाच राज्यांतच नव्हे संपूर्ण देशात पुन्हा कमळ फुलणार

प्रसन्न जकाते

Campaign Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं देशातील जनतेसाठी मोलाचं कार्य केलं आहे. त्यामुळं केवळ पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतच नव्हे तर संपूर्ण देशात पुन्हा एकदा कमळ फुलणार असल्याचा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मध्य प्रदेशमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी गडकरी सध्या प्रचार करीत आहेत. छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसर येथे आयोजित जनसभेला संबोधित केल्यानंतर त्यांनी भाजपला भक्कम यश मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. (BJP Leader & Central Minister Nitin Gadkari Say's Party will Win Lok Sabha Election 2024 Along With Five Assembly Elections 2023)

मध्य प्रदेशातील दौरा आटोपल्यानंतर प्रसारमाध्यमांनी गडकरी यांचं निवडणुकीबद्दल मत जाणून घेतलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळणार आहे. इतकच नव्हे तर २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही भाजपलाच बहुमत मिळेल. भाजप तीन राज्यात तर मजबूत स्थितीत असेल. मिझोराममध्ये पक्षाची स्थितीही चांगली राहणार आहे. तेलंगणातही जनता भाजपच्या पाठीशी उभी आहे, असं गडकरी म्हणाले.

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चव्हाण यांनी २० वर्षांत विकासाची भरपूर कामं केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप निवडणूक लढत आहे. मध्य प्रदेशातील जनतेचा भाजपवर विश्वास आहे. उर्वरित राज्यांमध्येही भाजपची स्थिती चांगली आहे. भाजपनं सातत्यानं विकासावर भर दिलाय. लोकांना तेच हवं आहे. कोविडसारख्या भीषण परिस्थितीतून सरकारनं देशाला सावरलं. देशाच्या कानाकोपऱ्यात मूलभूत सेवा-सुविधा पोहोचल्या आहेत, ज्या आतापर्यंत पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळं मतदारांना कळतं की कोण विकास करतोय, असं गडकरी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्लीतील प्रदूषणावर उपाय शक्य

दिल्लीतील प्रदूषणावर काही प्रमाणात उपाय करणं शक्य असल्याचं गडकरी म्हणाले. अनावश्यक पीक या भागांमध्ये जाळण्यात येतं. या पिकांचा वापर करून बिटुमेन, बायोसीएनजी, एलएनजी तयार करणे शक्य आहे. सीएनजी, एलएनजीसाठी हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेशात १८५ प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यातून पीक जाळण्याची समस्या सुटेल, असा विश्वासही गडकरी यांनी व्यक्त केला.

अनावश्यक पिकांना जाळण्याचं प्रमाण थांबेल. यातून इंधन निर्मितीचा वेग वाढल्यानंतर शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळेल. त्यातून ते अनावश्यक पीक जाळण्याचं थांबवतील, असंही गडकरी यांनी सांगितलं. यासाठी अधिक व्यापक प्रयत्न होणंही गरजेचं आहे, असं ते म्हणाले.

Edited by : Prasannaa Jakate

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT