BJP leader road accident news  Sarkarnama
विदर्भ

BJP leader death : अकाली एक्झिट! महिनाभरापूर्वी पदभार, आज काळाचा घाला; भाजप नेत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

BJP leader road accident news : महिनाभरापूर्वी पदभार स्वीकारलेल्या भाजप नेत्याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Rashmi Mane

गडचिरोली शहरातील राजकीय वर्तुळात धक्का देणारी घटना घडली आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पदभार स्वीकारला होता; मात्र काळाने अचानक झडप घालत त्यांचे आयुष्य संपवले.

ही दुर्घटना शुक्रवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास गडचिरोलीतील कारगिल चौक परिसरात घडली. मुक्तेश्वर काटवे हे आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. त्याच वेळी अचानक एक डुक्कर धावत येऊन त्यांच्या गाडीसमोर आडवा गेला. डुक्कर अचानक समोर आल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते जोरात रस्त्यावर आपटले. अपघात इतका भीषण होता की त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र अपघातात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. सर्वतोपरी प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.

मुक्तेश्वर काटवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. २०१६ साली झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत ते प्रथम विजयी झाले. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये पुन्हा जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडून दिले. अलीकडेच त्यांच्याकडे नगरपरिषदेच्या आरोग्य सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. शहरातील विविध विकासकामांमध्ये त्यांचा सहभाग होता. स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि नागरी प्रश्नांबाबत ते सातत्याने पाठपुरावा करत होते.

अचानक झालेल्या या अपघातामुळे शोककळा पसरली आहे. महिनाभरापूर्वीच महत्त्वाची जबाबदारी स्वीकारलेल्या सक्रिय नेत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT