Anil Patil Pavitrakar in AKola Sarkarnama
विदर्भ

Gram Panchayat Election : रणजित पाटलांच्या काकानं राखली, भावानं गमावली ग्रामपंचायत

Akola Rural Politics : स्थानिक आघाड्यांनी बिघडवलं अकोल्यात मोठ्या पक्षांचं गणित

जयेश विनायकराव गावंडे

Four way fight in the Cotton City : ग्रामपंचायत निवडणुकीमुळं गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात उडत असलेल्या राजकीय धुरळा अखेर सोमवारी (ता. ६) मतमोजणीनंतर शांत झाला. जिल्ह्यातील १५ ग्राम पंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. निवडणुकीत स्थानिक आघाडीचं प्रमाण वाढल्यानं मोठ्या पक्षांचे गणित काहीसं हुकलं. एक ग्राम पंचायतीची निवडणूक अकोला जिल्ह्यात बिनविरोध झाली. ३८ ग्रामपंचायतीची पोट निवडणूकही यावेळी घेण्यात आली.

अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात घुंगशी गावची निवडणूक महत्वाची मानली जात होती. भाजप नेते तथा माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचं घुंगशी हे गाव. येथे पाटील यांच्या घरातीलच दोन सदस्य एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात होते. त्यातील काकानं निवडणुकीत बाजी मारली, तर पाटील यांच्या भावाला पराभवाचा सामना करावा लागला. (BJP leader Ranjeet Patil's uncle wins Gram Panchayat Election in Akola District)

घुंगशी गावात काट्याची तिहेरी लढत झाली. डॉ. पाटील यांचे काका अनिल पाटील पवित्रकार आणि चुलतभाऊ राहुल पाटील हे एकमेकांविरोधात सरपंच पदासाठी मैदानात होते. पाटील यांच्या या दोन पॅनलच्या विरोधात प्रा. संजय देशमुख हे स्वतः सरपंच पदासाठी निवडणूक लढवित होते. त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीत तिहेरी लढतीचा सामना रंगला.

निवडणुकीत डॉ. रणजित पाटील यांचे काका अनिल पाटील पवित्रकार विजयी झालेत. राहुल पाटील यांचा पराभव झाला. प्रा. संजय देशमुख यांनाही मात सहन करावी लागली. अनिल पाटील यांना २६५ मतं मिळाली. प्रा संजय देशमुख यांना २११ आणि राहुल पाटील यांना १४६ मतं मिळाली. डॉ. पाटील यांच्या काकांचा ५४ मतांनी विजय झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. रणजित पाटील यांचे वडील व्ही. एन. पाटील आणि विज्युक्‍टा संघटनेचे पदाधिकारी प्रा. संजय देशमुख यांचे घुंगशी गावात महाविद्यालय आहे. २०१७ मध्ये व्ही. एन. पाटील यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत देशमुख यांच्या महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला मारहाण करताना डॉ. रणजित पाटील यांचे वडील दिसत होते. त्यावेळी डॉ. पाटील हे गृहराज्यमंत्री होते. त्यावरुन बराच वाद रंगला होता. तेव्हापासून घुंगशी येथे प्रा. संजय देशमुख आणि डॉ. रणजित पाटील यांच्या गटात निवडणूक काळात कायम रस्सीखेच बघायला मिळते.

अकोल्यातील निवडणुकीवर नजर

एकूण ग्रामपंचायत : १५

निवडणूक : १४

बिनविरोध : ०१

अकोला तालुका : ग्रामपंचायत : ०४ (Akola Gram Panchayat Election)

- कापशी : वेणूताई उमाळे : भाजप

- काटीपाटी : संगिता कासमपुरे : स्थानिक आघाडी

- एकलारा : राजेश बेले : भाजप

- मारोडी : पुजा वाघमारे : स्थानिक आघाडी

बार्शीटाकळी तालुका : एकूण ग्रामपंचायत : ०४ (Barshitakali Gram Panchayat Election)

- खोपडी : काँग्रेस

- दोनद खुर्द : सागर कावरे : राष्ट्रवादी शरद पवार गट

- खांबोरा : राष्ट्रवादी शरद पवार गट

- जांभरून : काँग्रेस

मूर्तिजापूर तालुका : एकूण ग्रामपंचायत : ०२

(Murtizapur Gram Panchayat Result)

- घुंगशी : अनिल पाटील पवित्रकार : वंचित

- गाजीपूर टाकळी : मिना सचिन दिवनाले : वंचित

पातूर तालुका : एकूण ग्रामपंचायत : ०१

(Patur Gram Panchayat Result 2023)

- कोसगाव : रत्नमाला करवते : राष्ट्रवादी अजित पवार गट

तेल्हारा तालुका : एकूण ग्रामपंचायत : ०३

(Telhara Taluka Gram Panchayat Result)

- बारूखेडा : अविरोध : स्थानिक आघाडी

- पिंपरखेड : भाजप

- झरीबाजार : काँग्रेस

अंतिम निकाल

भाजप : ०१

वंचित : ०२

काँग्रेस : ०३

स्थानिक आघाड्या : ०३

राष्ट्रवादी शरद पवार : ०२

राष्ट्रवादी अजित पवार : ०१

(Edited By : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT