Akola Muncipal Corporation Google
विदर्भ

Akola BJP : नेत्यांनी मागवली यादी कर्मचाऱ्यांची, बघणार कशी होत नाही स्वच्छता आता शहराची

Municipal Corporation Politics : महापालिकेनं सोपविली प्रभागनिहाय माहिती

जयेश विनायकराव गावंडे

A strange idea in ​​Akola for Municipal Corporation : नियमितपणे स्वच्छता होत नसल्यानं अकोला शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचली आहे. शहरातील अनेक प्रमुख मार्गांच्या दुतर्फा चांगलाच कचरा तुंबलाय. प्रभातफेरीला जाणाऱ्या प्रत्येक अकोलेकराला तर शहर किती अस्वच्छ आहे, याचं दर्शन भल्या पहाटेच होतं. अशात सफाई कर्मचारी अधिकाऱ्यांचे ऐकत नसल्याचीही ओरड वाढली आहे. त्यावर अकोल्यात भाजप ‘फ्रंटफूट’वर आली आहे.

उत्सवांचा काळ असल्यानं शहरातील स्वच्छता कशी होत नाही तेच बघतो, असं म्हणत भाजपनं अकोला महापालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची यादीत प्रशासनाकडून मागवली होती. महापालिका प्रशासनानं ही यादी भाजपला सोपवली असून, आता भाजप नेते सफाई कर्मचाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवणार आहेत. (BJP leaders will keep watch on ​​Akola Municipal Corporation sweaper's in City)

शहरात नियमित स्वच्छता होत नसल्यानं भाजपनं हा निर्णय घेतला आहे. महापालिकेत सध्या प्रशासक राज सुरू आहे. त्यापूर्वी येथं भाजपचीच सत्ता होती. आता निवडणुकीचा काळ जवळ आल्यानं भाजपनं पुन्हा शहरासाठी कंबर कसली आहे. महापालिकेत पुन्हा सत्ता यावी, यासाठी अकोला भाजप शहराच्या मुद्द्यांवर पुन्हा लक्ष केंद्रित करीत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत शहरात स्वच्छतेचा

बोजवारा उडाला तर त्याचं खापर आपल्या डोक्यावर फोडलं जाईल. त्यामुळं आतापासून सक्रियता दाखविणं योग्य ठरेल असं भाजपला वाटतंय. अकोलेकरांमध्ये सुरुवातीपासूनच मनपा प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, भारनियमन, वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित होणं, रस्त्यांची दुरवस्था, सहा महिन्यांतच बंद पडलेला उड्डाणपूल, पावसाच्या पाण्यामुळं गटारगंगा वाहणारा अंडरपार, अरुंद रस्ते, अतिक्रमण, वाहतुकीची समस्या यामुळं लोकांचा प्रशासनावर राग आहे. अशात विरोधकांनीही मालमत्ता करवाढीच्या मुद्द्यावर शहरात रान पेटवलं आहे. करवसुलीच्या कंत्राटात भाजपला कमिशन मिळत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर आता शहरात भाजप एक पाऊल पुढं आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहरतील नागरिक आता माजी नगरसेवकांविरोधात उघडपणे व्यक्त होऊ लागले आहेत. ही बाब लक्षात घेता मुख्य रस्त्यांच्या साफसफाईवर लक्ष ठेवण्यासाठी भाजपनं पुढाकार घेतला आहे. अंतर्गत भागांमध्येही स्वच्छता होतेय की नाही, यावरही भाजप देखरेख ठेवणार आहे. वर्तमानस्थितीत मनपाच्या आस्थापनेवर ७४७ स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. यातील अनेक कर्मचारी संघटनेच्या नावाखाली कर्तव्याकडं दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. काही कर्मचारी तर कामावर येतच नाहीत. ते व्याजानं पैसे वाटण्याचा व्यवसाय करतात. आपली सफाईची कामं करण्यासाठी त्यांनी हाताखाली कंत्राटी कर्मचारी ठेवल्याचाही आरोप आहे. पगार पूर्णवेळ कर्मचाऱ्यांच्या नावानं निघतो व त्यातून काही रक्कम हे कर्मचारी हाताखाली ठेवलेल्या खासगी माणसांना देतात असं सांगण्यात येतं. त्यामुळं स्वच्छता कर्मचाऱ्यांशी वाद होऊ न देता शहराची सफाई करून घेण्यासाठी तारेवरची कसरत नेत्यांना करावी लागणार आहे.

(Edited By : Prasannaa Jakate)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT