Eknath Shinde Latest Marathi news,  BJP News
Eknath Shinde Latest Marathi news, BJP News sarkarnama
विदर्भ

एकनाथ शिंदेंच्या बैठकांवर भाजपचा बहिष्कार ; पक्षपाताचा आरोप

सरकारनामा ब्युरो

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील स्थानिक आमदार-खासदारांना विश्वासात घेऊन विकासनिधीचे वितरण आणि कामे होत नसल्याचा आरोप करीत भाजप (bjp) लोकप्रतिनिधींनी यापुढील नियोजन बैठकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. (Eknath Shinde Latest Marathi news)

जिल्ह्यातील समस्यांची-प्रश्नांची माहिती लोकप्रतिनिधींना असते. ते सातत्याने आपापल्या क्षेत्रात जाऊन लोकांशी संपर्क ठेवतात.त्यामुळे तेथील प्रश्नांची त्यांना माहिती असते.अधिकारी बदलत असतात. शिवाय ते अभावानेच जिल्ह्यात दौरे करतात. अशा अधिकाऱ्यांना येथील प्रश्नांची माहिती आणि जाणीव कशी असेल, असा प्रश्न आमदार देवराव होळी यांनी उपस्थित केला.

होळी यांनी एक पत्रक प्रसिद्द करून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले. विकासकामांची आवश्यकता लक्षात घेवून त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा, असे पत्र पालकमंत्री शिंदे यांना अनेकदा स्मरणपत्रासह दिले. परंतु जिल्हयातील स्थानिक आमदार-खासदारांच्या पत्रांच्या मागणीची कुठेही दखल घेतली जात नाही.

जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून होणा-या विकासासाठी दिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखवून आमदार-खासदारांचा अपमान केला जात आहे. यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निषेधार्थ यापुढे होणा-या जिल्हा वार्षिक नियोजन बैठकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भाजपच्या लोकप्रतिनिधींनी घेतला आहे. यात गडचिरोली-चिमूर लोकसभेचे खासदार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरीचे आमदार कृष्णा गजबे, विधान परिषद सदस्य रामदास आंबटकर यांचा समावेश आहे.

जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पुष्कर यात्रेसाठी 10 कोटींचा निधी देण्यात आला. या निधीतून किती कामे झाली, त्याचा दर्जा काय, निधी किती खर्च झाला, बाकीचा निधी कुठे गेला, असे अनेक प्रश्न आमदार होळी यांनी उपस्थित केले. "निधी शासनाचा वापरून यात्रेत मात्र शिवसेनेचा प्रचार केल्याचे दिसत होते. जणू काही शिवसेनेचे आयोजन आहे की काय असा प्रश्न पडावा. पालकमंत्र्यांचे दलाल इथे सक्रिय आहेत. दलालांच्या मार्फतीने कामे केली जात आहेत," असा गंभीर आरोपही होळी यांनी केला.

"मागणी करा निधी उपलब्ध करून दिला जाईल, जिल्ह्याच्या विकासासाठी लागणारा निधी आपण कमी पडू देणार नाही," असे आश्वासन देणाऱ्या पालकमंत्र्यांनी केवळ कागदावर निधी वाटप केला.प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची विकास कामे झालेली नाहीत. मागासलेला जिल्हा म्हणून जिल्हयाच्या विकासासाठी मिळणारा कोटयावधींचा निधी अखेर गेला कुठे, असा प्रश्न त्यांनी केलाय. भाजप लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेवर पालकमंत्री काय तोडगा काढतात,याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT