Mahavikas Aghadi's Meeting in Nagpur : दर्शन कॉलनीच्या मैदानावर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या विरोधात स्थानिक नागरिकांच्यावतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सभेचे स्थान बदलण्यात यावे, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. न्यायालयात या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. (The court will hear the petition tomorrow)
खेळाडूंसाठी विकसित करण्यात आलेल्या दर्शन कॉलनीतील मैदानावर महाविकास आघाडीच्या सभेला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी दर्शन कॉलनी परिसरातील नागरिकांनी जनहित याचिकेच्या माध्यमातून केली आहे. यात एकूण चार नागरिकांचा समावेश आहे. दर्शन कॉलनीतील मैदानात खेळाडू नियमित सराव करतात. अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे मैदान खेळासाठी विकसित केले आहे.
सभेमुळे मैदान खराब होण्याची शक्यता असल्याने भाजप व परिसरातील नागरिकांचा यास विरोध आहे. याशिवाय मैदानाच्या सभोवतालच्या गल्ल्या अतिशय अरुंद आहे. सभेमुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेला दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ॲड. माहेश्वर आणि ॲड. चकोले यांच्यामार्फत ही याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
दर्शन कॉलनीतील सभेवरून काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये चांगलाच वाद सुरू आहे. काँग्रेसने याच मैदानावर सभा घेण्याचे ठरविले आहे. याकरिता नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यासकडून परवानगीसुद्धा घेतली आहे. उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) अजित पवार, (Ajit Pawar) नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात हे राज्यातील बडे नेते सभेत सहभागी होणार आहे. त्यामुळेही सभेला ऐतिहासिक गर्दी जमविण्यासाठी तीनही पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
मैदान बचाव समितीच्यावतीने सातत्याने सभेच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. मंगळवारी हनुमान चालिसा पठण करण्यात आले होते. उद्या सकाळी ११ वाजता क्रिकेट टुर्नामेंट घेण्यात येणार असून त्यात मैदान बचाव समितीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. दुपारी एक वाजता सुंदरकांड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.