BJP and MNS  Sarkarnama
विदर्भ

मनसे विरुद्ध भाजप वाद पेटला! पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण

भाजप (BJP) विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) असा वाद आता पेटला आहे.

सरकारनामा ब्युरो

बुलडाणा : बुलडाण्यात भाजप (BJP) विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) असा वाद आता पेटला आहे. मनसेचे पदाधिकारी अजय खरपास यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. राज्यातील आगामी महापालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर मनसे आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

चिखलीचे मनसेचे शहर सचिव अजय खरपास यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. त्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी दोन दिवसात आरोपींना अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. पोलिसांनी आरोपींना अद्यापही अटक केलेली नाही. त्यामुळे जखमी अजय खरपास यांच्या नातेवाईकांसह चिखली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसाना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी करण्यात आली. वेगवेगळ्या विषयांवर नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यालाच मारहाण झाल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहे. यावरून मनसैनिकांनी भाजपविरोधात जोरदार मोहीम उघडली असून, त्याचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे.

लवकरच महापालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. भाजपही या निवडणुकीत जोर लावला आहे. या निवडणुकांसाठी मनसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. या निवडणुका तोंडावर असताना आता मनसे आणि भाजपमधील संघर्ष वाढला आहे. मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण भाजप पदाधिकाऱ्यांना महागात पडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT