BJP vs Congress Chandrapur: चंद्रपूर शहराच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खेडकर एका मताने विजयी झाल्या. यामध्ये उघड आणि पडद्यामागून मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे निकालानंतर काँग्रेस नेत्यांत नैराश्य पसरले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निकालानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केले आहे. या प्रतिक्रियांमधून त्यांची देहबोली आणि चेहऱ्यावरील भाव असहाय्यता प्रकट करणारी होती. मात्र स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणारे काँग्रेसचे पारंपारिक त्याला कारणीभूत ठरले, अशी चर्चा आहे.
या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने अनाकलनीय भूमिका घेतली. या भूमिकेने उद्धव ठाकरे यांची भविष्यात मोठी अडचण आणि राजकीय दृष्ट्या वैचारिक कोंडी होणार आहे. सत्ता गमावल्यावर पक्षातील नेत्यांत कशी बेदीली माजते याचे हे उदाहरण ठरले.
काँग्रेस पक्षातील माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर पक्षातून आरोप होऊ लागले आहेत. काँग्रेसने हातात असलेले महापौर पद गमावले. भाजप पेक्षा अधिक संख्याबळ असूनही हे घडले.
या परिस्थितीचा पुरेपूर फायदा भाजप नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. महापौरपद हिसकावल्यावर आता त्यांनी काँग्रेस नेत्यांवर सायकॉलॉजिकल स्ट्राइक केला आहे. काँग्रेस नेत्यांमुळेच महापौर पद मिळाले असा दावा मुनगंटीवार यांनी केला. काँग्रेसमधील नैराश्य आणि नेत्यांतील दुरावा आणखी वाढावा ही चाल त्यांनी खेळली आहे.
काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांचे चिरंजीव राहुल पुगलिया यांच्याच घरी भाजपची बैठक झाली. आम्हाला विकास हवा आहे. त्यामुळे महापौरपद भाजपला मिळावे, यासाठी मदत करण्याचा शब्द पुगलीया यांनी दिला. तो त्यांनी पाळला, असा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे.
यामध्ये काँग्रेसपुढे मोठे धर्मसंकट निर्माण होणार आहे. आधीच धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या भूमिकेबाबत मंथन करण्याचे विधान वडेट्टीवार यांनी केले होते. आता त्यात राहुल पुगलीया यांची भर पडली आहे.
यामध्ये नेत्यांतील दुरावा वाढावा, काँग्रेसने पुगलीया यांच्यावर कारवाई करावी. त्यानंतर कारवाई झालेल्या त्या नेत्यांना भाजपने आपल्या पक्षात आयत्याच पायघड्या घालाव्या, हा डाव यामागे नसेल, हे विधान धाडसाचे ठरेल. त्यामुळे चंद्रपूरच्या महापौर पदाच्या निवडणुकीनंतर भाजपने आता काँग्रेस नेत्यांवर सायकॉलॉजिकल स्ट्राइक केला आहे. त्यातून आत्मविश्वास गमावलेले काँग्रेस नेते कसे सावरतात हा उत्सुकतेचा विषय असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.