BSP, Nagpur Sarkarnama
विदर्भ

BSP : आरक्षण लागू होऊच नये, यासाठी भाजपचा जन्म झाला; बसपाचा आरोप !

सरकारनामा ब्यूरो

नागपूर : नागपूरसह राज्यात भाजपने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यांच्या भ्रष्ट्राचाराची पोलखोल बसपा करणार आहे. याची सुरुवात नागपुरातून होईल, अशी माहिती बसपाचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने आणि महाराष्ट्र प्रभारी प्रमोद रैना यांनी काल रविभवन येथे पत्रकार परिषदेत दिली.

ताजने यांनी सांगितले, नागपूर (Nagpur) महापालिकेत (Municipal Corporation) दोन दशकापासून भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री भाजपचे होते, आताही भाजपचे उपमुख्यमंत्री आहे, तरी नागपूरला भकास केले आहे. विकासाच्या नावावर नुसता पैसा खर्च केल्याचे दिसून येते. भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली जाईल, प्रत्येक वार्डात कार्यक्रम होतील. राजकीय नेत्यांवर आरोप होत राहतात, माझ्यावरही झाले. पक्षातील ज्या कार्यकर्त्यांनी आरोप केले, ते आता कुठे आहेत, असाही टोला ताजने यांनी लगावला. राज्यात मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार होत आहेत. भाजप (BJP)कॉंग्रेस (Congress) दोन्ही पक्ष सारखेच आहेत, असे ते म्हणाले. यावेळी प्रदेश महासचिव नागोराव जयकर, जितेंद्र घोडेस्वार आदी उपस्थित होते.

राज्यातील निवडणूक स्वबळावर..

येणाऱ्या निवडणुकीची पूर्ण तयारी पक्षाने केली असून सर्व जागांवर उमेदवार उभे करण्यात येतील. जास्तीत जास्त ठिकाणी महापौर देण्याचा प्रयत्न राहील. ही निवडणूक स्वबळावर पक्ष लढवणार आहे. दोन, तीन पक्षांनी संपर्क साधला असून त्याची माहिती सुप्रिमो मायावती यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेवरून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे ताजने यांनी सांगितले. पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी १०० प्रशिक्षित कार्यकर्ते नागपुरात तळ ठोकून राहणार असून कॅडर कॅम्प घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गुरुवारला विदर्भ हिंदी मोरभवन येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. प्रदेश प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ मार्गदर्शन करतील. संविधान चौक येथून मेळाव्याच्या स्थळापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या देशात आरक्षणाची अंमलबजावणी होऊ नये, यासाठी काँग्रेसने काम केले, तर आरक्षण लागू होऊच नये, यासाठी भाजपचा जन्म झाला आहे, अशी टीकाही ताजने आणि रैना यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT