Chandrashekhar Bawankule News : लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने हाती घेतलेल्या निरनिराळ्या अभियानापैकी एक असलेल्या आणि प्रत्येक उंबरट्यावर जाण्यासाठी सुरू केलेल्या 'घर चलो अभियान' अभियानाचे नारळ फुटले. या अभियानातून मोदी सरकारची कामगीरी लोकांना पटऊन देण्याचा भाजपचा (BJP) प्रयत्न आहे. मुंबईसह राज्याच्या सगळ्याच भागात हे अभियान ताकदीने राबविण्याचे नियोजन भाजपने केले आहे.
लोकसभेच्या निवडणुका अवघ्या १० महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीमध्ये विरोधकांचेही भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे. यामुळे केंद्र सरकारच्या नऊ वर्षातील योजनांची माहीती लोकांना देण्यासाठी भाजपने "घर चलो अभियान" सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात उमरेड विधानसभा मतदारसंघातून झाली.
''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे आज देशातील जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात आहेत. त्यांच्या सक्षम नेतृत्वात देश प्रगतीपथावर यशस्वीरित्या वाटचाल करत आहे. मोदीजींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या केंद्र सरकारच्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्यासाठी व त्यांच्या नेतृत्वाप्रती समर्थन मिळवण्यासाठी "घर चलो अभियान" राबवले जात असल्याचे'' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.
''याच अंतर्गत उमरेड मतदारसंघातील कुही, उमरेड व भिवापूर या तिन्ही तालुक्यातील ११ गावांना भेट दिली. दौऱ्याची सुरुवात कुही तालुक्यातील तितूर येथून झाली, त्यानंतर कुही, चापेगडी, वेलतूर, मांढळ या गावांना तर उमरेड तालुक्यातील आपतूर, मकरधोकडा, बेला, सिर्सी, उमरेड व भिवापूर तालुक्यातील नांद या गावांना भेटी देत पाच हजाराहून अधिक नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधळ्याचे'' बावनकुळे म्हणाले.
''यानिमित्ताने केंद्र सरकारच्या ९ वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडला व केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली. यावेळी आबालवृद्धांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाविषयी विश्वास दिसून आला.'' या वेळी नागपुर (Nagpur) ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार सुधीर पारवे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, आनंदराव राऊत, रुपचंद कडू, भाजयुमो नागपुर ग्रामीण जिलाध्यक्ष आदर्श पटले, विवेक सोनटक्के, डॉ. शिरीष मेश्राम, रजनी लोणारे, माया पाटील, प्रमोद घरडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.