Sandeep Joshi Nagpur
विदर्भ

BJYM Nagpur News : ‘कलंक’ला भाजयुमो असे देणार उत्तर, मातोश्रीवर पाठवणार ३० हजार पत्र…

सरकारनामा ब्यूरो

`हा तुमच्या नागपूरला लागलेला कलंक आहे’, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केले होते. २ जुलै रोजी केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. भाजपच्या सर्व आघाड्यांकडून ठाकरेंचा निषेध करण्यात आला. त्यानंतरही ठाकरे आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले. (Thackeray was condemned by all BJP fronts)

आता भारतीय जनता युवा मोर्चा उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर ३० हजार पोस्टकार्ड पाठवणार आहे. भाजयुमोने आजपासून ‘देवेंद्रजी आमचा अभिमान’ हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तब्बल ३० हजार पत्र पाठवली जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाचं आजपासून हे अभियान सुरू केलं आहे.

२२ च्या वर्षी रामजन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी होणारे, नगरसेवक ते मुख्यमंत्री पदापर्यंत यशस्वी वाटचाल करणारे आणि विकासाचा चेहरा असलेले, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा अभिमान आहेत, हे उद्धव ठाकरे यांना कळावं, म्हणून मातोश्रीवर ३० हजार पत्र पाठवतोय, असं भाजप नेते माजी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून २२ जुलैपर्यंत भाजपचे युवा वॉरीयर्स सर्वसामान्यांकडून पत्र लिहून उद्धव ठाकरे यांच्या घरी 30 हजार पोस्टकार्ड पाठवणार आहेत.

पहिल्यांदा आम्ही आंदोलन केले. कारण कार्यकर्त्यांमध्ये संताप होता. या पद्धतीचे वक्तव्य ठाकरेंनी केलेच कसे. त्यामुळे कार्यकर्ते खवळले होते. पण पुतळे जाळणे, शिव्या देणे योग्य नाही. कारण आमचा नेता हा सकारात्मक व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो. देवेंद्र फडणवीस म्हणजे केवळ काहीतरी शिकून राजकारणात आलेले नेते नाहीत, तर एलएलबी, एलएलएम आणि तेसुद्धा गोल्ड मेडलिस्ट असलेले नेते आहेत.

फडणवीस २२व्या वर्षी नगरसेवक झाले. दोन वेळा नगरसेवक, दोन वेळा महापौर आणि पाच वेळा आमदार झाले. राज्याचे प्रमुख पद त्यांनी भूषवलेले आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन भाजयुमोच्या युवा वॉरिअर्सनी ही सकारात्मक चळवळ सुरू केली आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पत्र लिहीत आहो. ‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) केवळ नागपूरचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा (Maharashtra) अभिमान आहे’, असे पोस्टकार्ड आम्ही नागपुरातून उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी पाठवत आहोत, असे संदीप जोशी यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT