मुंबई : इंग्रजांना जेरीस आणून आपण स्वातंत्र्य मिळवले आहे. त्यासाठी अनेकांनी जिवाची बाजी लावली आहे. पण आता स्वतंत्र भारतात भाजप इंग्रजांची राजवट आणू बघत आहे. आमच्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडे नसल्यामुळे ईडीच्या धमक्या दिल्या जात आहेत. पण आता हे जास्त काळ चालणार नाही, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केला.
ईडी, (ED) सीबीआय, इन्कम टॅक्स यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षांतील भाजप नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात. भाजपचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मुख्य व्यवसाय झाला आहे. परंतु लोकशाहीत हे फार काळ टिकणार नाही, असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळणार आहे. इंग्रजांनी हुकूमशाही कारभार केला त्याला जनता घाबरली नाही आता स्वतंत्र भारतात भाजप इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच पद्धतीने कारभार करू पाहात आहे पण ते आता शक्य नाही.
महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडतानाही भाजपकडून याच पद्धतीचा अवलंब केला. भाजपने कारवाईच्या कितीही धमक्या दिल्या तरी महाविकास आघाडीचे नेते अशा धमक्यांना घाबरणार नाहीत. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत त्यावर सरकारकडे उत्तर नाही म्हणून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने धमक्या देऊन विरोधकांना घाबरवण्याचे राजकारण केले जात आहे. ईडी सरकारची उलटी गिनती सुरू झाली असून जनतेचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहू, असेही नाना पटोले म्हणाले.
विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांत तातडीने मदत पोहोचवा..
वैनगंगा नदीच्या कोपामुळे भंडारा जिल्ह्यातील जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. शिवारांत पाणी साचल्याने धान पीक सडण्याच्या मार्गावर आहे. मोहाडी, लाखांदूर, पवनी या तालुक्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. येथे त्वरित मदतकार्य पोहोचवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत केली. अतिवृष्टीमुळे राज्यात गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांत पाणी साचले आहे, घरे पडली आहेत, शेती उद्ध्वस्त झाली आहे, अन्नदाता अडचणीत आला आहे. त्यावर चर्चा झाली पाहिजे. यावर सरकारला निवेदन करण्याचे आदेश द्यावेत, असे नाना पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.