Ambadas Danve
Ambadas Danve Sarkarnama
विदर्भ

Ambadas Danve News: आर्थिक सल्लागार समितीवर अदानी, अंबानीची मुले, तीही बैठकांना येत नाहीत !

सरकारनामा ब्यूरो

Ambadas Danve in Budget Session 2023 : नीती आयोगाच्या धरतीवर महाराष्ट्रात मैत्री संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेवर नियुक्त करण्यात आलेल्या दोन उपाध्यक्षांपैकी एकाने नगरविकास विभागात मोठा भ्रष्टाचार करण्याचे प्रयत्न केले. असे लोक संस्थेचे काय काम करणार, असा सवाल करीत सरकारला राज्याच्या विकासात नव्हे, तर स्वतःच्या स्वार्थामध्ये रस आहे, असा घणाघात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

सौर ऊर्जा योजनेबाबतही दानवे यांनी सरकारवर टिका केली. ते म्हणाले, आजही जिल्ह्यांच्या वेबसाइट सुरू नाहीत. १० हजार सौर ऊर्जेचे अर्ज आलेले आहेत. पण त्यांना लाभ दिला जात नाही. शिवाय मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे सर्वत्र पोस्टर्स लागलेले आहेत.

हे दवाखाने संपूर्ण महाराष्ट्रभर नाही, तर केवळ मुंबईतच आहेत. नवी मुंबईतील कोपरी या गावात आरोग्य केंद्र नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने दवाखाने केवळ मुंबईतच आहे. ग्रामीण भागात गरज असतानाही तेथे हे दवाखाने नाहीत. राज्य सरकारने आर्थिक सल्लागार समिती नेमली. त्यामध्ये अदानी, अंबानीची मुले घेतली. ह लोक बैठकांनाही येत नाहीत. लांगूलचालनाची सरकारची भूमिका आहे.

समृद्धी महामार्गाचा मोठा गवगवा करण्यात आला. पण जंगली श्‍वापदं रस्त्यावर येतात. त्यामुळे अपघात होत आहेत. याची दखलही घेतली जात नाही. हा लोकांच्या जिवाशी खेळ आहे. प्रधानमंत्री (Prime Minister) ग्रामसडक योजनेमध्ये २६ हजार ७३१ किलोमीटर अंतराचे रस्ते झाल्याचे सांगितले जाते. पण हे रस्ते या सरकारच्या काळातील नाही. तर २००१पासून आजपर्यंत झालेले आहे. जनतेच्या डोळ्यात केलेली ही धुळफेक आहे, असेही दानवे (Ambadas Danve) म्हणाले.

घरकुल करत असताना ग्रामीण भागात १,२०,०००, तर शहरी २,६७,००० रुपये दिले जातात. पण ही तफावत का, याचे उत्तर सरकार देत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात शबरी योजनेची अंमलबजावणी होत नाही. निधी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पण महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने असा निर्णय अद्याप घेतला नाही. प्रतिव्यक्ती ५५ लीटर पाणी रोज पाहिजे. घरोघरी नळ लावले जातात, तोटी लागते, पण पाणी नाही. हर घर जल योजना पुढे नेण्याची गरज आहे. याशिवाय २ लाख २७ हजार शेतकऱ्यांना (Farmers) प्रोत्साहन योजनेचा लाभ अद्यापही दिलेला नसल्याचे अंबादास दानवे यांनी सभागृहाला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT