Ashish Deshmukh
Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Budget : डॉ. आशिष देशमुखांनी केले अर्थसंकल्पाचे स्वागत अन् राष्ट्रवादीवर हल्ला !

सरकारनामा ब्यूरो

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे. अर्थातच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाची निंदा केली आहे. त्यात फक्त एकच नेते असे आहेत की, ज्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले.

कॉंग्रेसचे नेते आणि माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करताना. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिकाही केली आहे. डॉ. देशमुख म्हणतात, राज्याचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी चांगला आहे, हे विरोधकांना मान्य करावं लागेल. विरोधक या अर्थसंकल्पाचं स्वागत नक्कीच करतील. १२ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार ही मोठी गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीचं कौतुक केलं पाहिजे. मी विरोधक जरी असलो, तरी ते करतो.

पीकविमाचे प्रिमियम राज्य सरकार भरणार आहे. संजय गांधी निराधार योजनेत वाढ केली आहे. राजकीय परिस्थिती बिघडत चालली होती. पण त्यावर औषधोपचार म्हणून या बजेटकडे पाहावे लागेल. पण विमा कंपन्यांना प्रत्येक शहरात कार्यालय स्थापन करण्यासाठी सक्ती करायला पाहिजे होती. नाहीतर राज्य सरकारने हा निर्णय चांगला घेतला. पण विमा कंपन्यांनी मागचीच री ओढली तर त्याचा काही फायदा होणार नाही, असे आशिष देशमुख म्हणाले.

राष्ट्रवादीने ती स्पेस घ्यायला हवी होती..

नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने खंबीर भूमिका घ्यायला पाहिजे होती. कारण त्यांच्या या भूमिकेने राजकीय परिस्थितीवर परिणाम होणार आहे. राष्ट्रवादीच्या संदर्भात राज्यात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. नागालॅंडमध्ये निवडून आलेले त्यांचे सर्व आमदार सत्तेसोबत गेले. तेथे त्यांना विरोधी पक्षाची स्पेस घेता आली असती. पण त्यांनी तसे न करता भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. याचा फटका त्यांना महाराष्ट्रात नक्की बसेल असे आशिष देशमुख म्हणाले.

हा औषधोपचार..

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा झटका बसला. त्यानंतर पुण्यात झालेल्या पोटनिवडणुकीतही कसब्यामध्ये त्यांना मोठी हार पत्करावी लागली. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तब्येत खराब होत चालली होती, त्यावरचा औषधोपचार म्हणजे आज सादर केलेला अर्थसंकल्प आहे, असेही डॉ. देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT