Congress vs BJP Maharashtra : मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जीवे मारण्याचा कट रचल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं होते. धनंजय मुंडे यांनी जरांगे यांचे आरोपी परतून लावत, नार्को टेस्ट करण्याची आणि सीआयडी चौकशीची मागणी केली.
जरांगे यांनी देखील नार्को टेस्टची तयारी दर्शवली. यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करत खळबळ उडवून दिली.
काँग्रेसचे (Congress) हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "धनंजय मुंडे आणि जरांगे पाटील, याप्रकरणी जर कोणी मुख्य आरोपी असेल, तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत." ज्यावेळी मराठा आंदोलक बांधव अंतरवाली सराटीत होते, त्यावेळी त्यांनी पोलिसांकरवी गुंडागर्दी करत त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला. यामुळे महाराष्ट्रातील सोशल फॅब्रिक डिस्टर्ब केला, असाही हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केला.
'अंतरवाली सराटीनिमित्ताने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात, एक प्रवर्ग दुसऱ्या प्रवर्गाच्या विरोधात लढवून टाकला. त्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण गढूळ केलं, जर कोणाची नार्को टेस्ट करायची असेल, तर ती देवेंद्र फडणवीस यांची व्हायला पाहिजे.
त्यांनी या महाराष्ट्राचा कसा खेळखंडोबा लावला, कसे जाती जातीत भांडण लावले, कोणच्या खिशात सरकारी जमिनी विकल्या. याची चौकशी त्या नार्को टेस्ट अंतर्गत झाली पाहिजे,' असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.
शताब्दी हॉस्पिटल जमीन व्यवहार घोटाळ्यावर, हर्षवर्धन सपकाळ यांनी, राज्यात अनेक स्कँडल महाराष्ट्रात चालले आहे . एक-एक करून त्याचा पर्दाफाश होणार आहे. सरकारी जमिनी अन् वादग्रस्त जमिनी गिळंकृत करण्याचा सपाटा लावला. यात भाजप मोठा चॅम्पियन पक्ष आहे. सरकारने याची श्वेत पत्रिका काढावी. हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात एक दिवस, यावर चर्चा व्हावी, अशी मागणी केली.
'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्ताने, महायुतीत गुंडाना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे, यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी, मटका किंग, आका-खोका, कोयता गँग, अशांना सत्ताधारी पक्षात रेड-कार्पेट टाकून स्वागत केलं जात आहे.
या सर्व गुंडांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये घेऊन जात आहेत. महाराष्ट्रात गुंडाराज स्थापित करण्याच्या दृष्टीकोनातून राज्याच्या गृहमंत्री मुख्यममंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न सुरू आहेत,' असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.
बिहार निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस संपल्याचे म्हटले होते. त्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी, काँग्रेसला संपवण्यासाठी अजून कोणीही पैदा झाला नाही, तर काँग्रेस भारताच्या डीएनए मधून तयार झालेला, कसलेला एक विचार आहे, हा विचार चंद्र-सूर्य असेपर्यंत हा कायम राहणार आहे, असे म्हटले.
समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग होता. यामध्ये 20 हजार कोटीचा भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यात, कुठेही सुरक्षतेचा विचार केला गेला नाही. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा सदोष महामार्ग आहे."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.