Buldhana Crime :
Buldhana Crime :  
विदर्भ

Buldhana Crime : घरात घुसून महिला सरपंचासहित मुलांना बेदम मारहाण...

सरकारनामा ब्युरो

Buldhana Crime : बुलडाणा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मेहकर तालुक्यात सारशिव गावातील महिला सरपंचाला १५ जणांनी बेदम मारहाण केली आहे. इतकचं नव्हे तर, या लोकांनी सरपंच महिलेच्या मुलांनादेखील मारहाण केली. रमाबाई जाधव असे या महिला संरपंचाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२२ डिसेंबर) १५ जणांनी अचानक रमाबाई जाधव यांच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली. तू फुकट सरपंच झाली, अचानक जाधव यांच्यासह त्यांच्या मुलांवरही हल्ला केला. या घटनेनंतर जाधव यांनी थेट जानेफळ पोलीस स्टेशन गाठले. पण तिथे त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. पण तिथूनही त्यांना तक्रार घेऊन पुन्हा जानेफळ पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले.

सरपंच रमाबाई जाधव बराच वेळ ताटकळत जानेफळ पोलीस स्टेशनला बसल्या होत्या. तरीही मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे त्या हतबल झाल्या. त्यांना झालेल्या मारहाणीत त्यांचा हात फॅक्चर झाला असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. हा प्रकार गंभीर असूनही पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT