Buldhana DCC Bank Election Results: सुमारे १५ वर्षांनंतर नुकत्याच झालेल्या बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने २१ पैकी १९ जागी निवडून येत एकहाती विजय मिळवला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंत्री अशा सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत हा विजय मिळवला. मात्र या सर्वांच्या विरोधात लढूनही कायंदे यांनी दोन जागा मिळवत सहकारात चंचूप्रवेश केला आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत १२ जागांवर संचालक बिनविरोध निवडून आणले होते. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मयूर बाहेकर, अंकुशराव पाटील, राजेश देशमुख, पांडुरंग पाटील, दिनेश काळने, प्रसेनजीत पाटील, कावेरी सोनसळे, जालिंदर बुधवत यांचा समावेश होता. उर्वरित नऊ संचालकांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.
या निवडणूक प्रक्रियेत आपल्या उमेदवारांना डावल्याचा आरोप करीत आमदार मनोज कायंदे यांनी स्व. अजित दादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल उभे केले होते. यामध्ये ज्ञानेश्वर पाटील आणि शिवचंद्र तायडे यांनी विजय मिळविला आहे. तर सहकार पॅनेलमधील उर्वरित निवडून आलेल्या संचालकांमध्ये माजी संचालक सुनील उदयकार, गोविंद मिरगे, गोविंद मापारी, माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, श्रीकांत मारोडे, तर महिला राखीव मतदार संघातून अस्मिता हेलगे व पुष्पाताई बारवकर हे निवडून आले आहेत.
अध्यक्षपदी पुन्हा डॉ. शिंगणे?
जिल्हा सहकारी बँकेवर सर्वाधिक काळ शिंगणे परिवाराचेच वर्चस्व राहिले आहे. सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे, स्वतः डॉ. राजेंद्र शिंगणे, स्व. प्रभावती काकू भास्करराव शिंगणे यांच्याकडे यापूर्वी अध्यक्ष पद होते. सहकारातील अनुभव लक्षात घेता यावेळी सर्वपक्षीय नेते अध्यक्षपदासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव पुढे करून बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करतील अशी शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.