Buldhana Ganesh Visarjan Firing Video Sarkarnama
विदर्भ

Buldhana News : हर्षवर्धन सपकाळांचा फोटो, युवकाच्या हातात रिव्हॉल्वर अन् गोळीबाराचा दावा; बुलढाण्यात खळबळ

Viral video allegedly shows aerial firing during a Ganesh immersion procession in Buldhana; Sanjay Gaikwad seeks a police probe : तांदुळवाडीतील गणेश विसर्जन मिरवणुकीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; संजय गायकवाडांची कारवाईची मागणी

Pradeep Pendhare

Buldhana Firing Video : गणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बुलढाण्यात राजकीय वातावरण तापले आहे. बुलढाणा शहरातील तांदुळवाडी येथील विसर्जन मिरवणुकीतील असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही युवक नाचताना दिसत आहेत.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा फोटो हातात घेऊन नाचतानाही काही जण दिसत आहेत. त्यानंतर एका युवकाने रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) समोर आल्यानंतर काँग्रेसविरोधकांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणाची पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दावा केला की, तांदुळवाडीतील गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेनेची सात मंडळे आणि काँग्रेसचे एक मंडळ सहभागी झाले होते. या मिरवणुकीत हर्षवर्धन सपकाळ यांचा फोटो घेऊन काही युवक सहभागी झाले होते. त्याचवेळी एका युवकाने रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केल्याचे त्यांनी सांगितले.

“हा व्हिडिओ आमच्या तांदुळवाडीमधीलच आहे,” असा दावा गायकवाड यांनी केला आहे. तसेच हवेत गोळीबार करणाऱ्या युवकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले. गावात अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही, असे बजावण्यात आल्याचे गायकवाड यांनी म्हटले.

दरम्यान, मिरवणुकीत शस्त्राचा वापर करून हवेत गोळीबार केल्याचा प्रकार खरा असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. “मिरवणुकीत अशा प्रकारे गोळीबार करण्याची हिंमत वाढत असेल, तर पोलिसांनी या प्रकरणात निष्पक्षपणे कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT