संजय जाधव
मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, भाजपचे नेते शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात संचालकांनी अविश्वास ठराव आणला होता. त्याचा निकाल आज लागला. भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती गटाने हा ठराव जिंकला आहे. निकालानंतर दोन्ही गटात तुफान राडा झाला.
मलकापूरमध्ये (Malkapur) भाजपाच्या दोन गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वासचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. संचेती गटाला 13 संचालकांनी पाठिंबा दिला आहे. तर तायडे यांच्या बाजूने दोन संचालक होते. तायडे यांना आपले सभापतीपद गमवावे लागले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निकाल जाहीर झाल्यानंतर दोन्ही गटातून घोषणाबाजी करण्यात आली. घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी (Buldhana Police) सौम्य लाठीचार्ज केला. यावेळी काही जणांनी दगडफेक केली. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.
भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या नेतृत्वाखाली तायडे यांना सभापती बनविण्यात आले होते. पण काही काळानंतर तायडे यांनी मनमानी कारभार सुरु केला. निर्णय घेताना तायडे हे बाजार समितीच्या सदस्यांना डावलत असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव मांडण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.