Tupkar Vs Raimulkar  Sarkarnama
विदर्भ

Buldhana News : तुपकरांच्या कानाखाली आवाज काढावाच लागेल; शिंदे गटातील आमदाराचं वादग्रस्त विधान

Mangesh Mahale

Buldhana : लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वत्र राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी इच्छुकांचे बॅनर झळकले आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. तुपकरांवर टीका करताना शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांची जीभ घसरली आहे.

रविकांत तुपकर आणि त्यांच्या पत्नी अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांच्यावर जाहीर सभेत रायमुलकरांनी शिव्यांची लाखोली वाहिली. रविकांत तुपकर यांच्या कानाखाली आवाज काढावा लागेल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. मेहकर तालुक्यातील उकळी-सुकळी या गावात झालेल्या जाहीर सभेत आमदार रायमुलकर बोलत होते.

"रविकांत तुपकरांच्या सभेत घुसून त्यांच्या कानाखाली मारू," असे ते म्हणाले. खासदार प्रतापराव जाधव यांनीही तुपकरांवर टीकास्त्र डागले आहे. आता यावर रविकांत तुपकर हे काय उत्तर देतात हे पाहावे लागेल. रायमुलकरांच्या विरोधात तुपकारांचे समर्थक काय भूमिका घेतात, हे लवकरच समजेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रविकांत तुपकर (ravikant tupkar latest marathi news) हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार (buldhana constituency) आहेत. मी संसदेत निश्चित जाईन असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळातील हाेणारी लोकसभा निवडणूक लोकसहभागाने आणि लोकवर्गणीतून आम्ही लढणार आहे. १०० टक्के मी बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणारसुद्धा. "एक व्होट आणि एक नोट" या तत्त्वावर मी निवडणूक लढणार, कारण मी फाटका माणूस, माझ्याकडं पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करीत नाही. माझ्याकडे नंबर दोनचे पैसे नाहीत, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.

Edited by: Mangesh Mahale

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT