Shweta Mahale sarkarnama
विदर्भ

'कमळीबाई' म्हटल्यावरुन मनसे कार्यकर्त्यांला आमदार महालेंच्या भावाकडून मारहाण

काही दिवसापूर्वी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या विषयी मनसे कार्यकर्ता विजय खरपास याने सोशल मीडियावर 'कमळीबाई' असा उल्लेख केला होता.

सरकारनामा ब्युरो

बुलढाणा : सोशल मीडियावर (Social Media)भाजपच्या आमदारा श्वेता महाले (Shweta Mahale)यांच्या आक्षेपार्ह विधान केल्यावरुन भाजप आणि मनसे (MNS)यांच्या वाद निर्माण झाला आहे. यावरु मनसे-भाजप कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकले आहेत.

काही दिवसापूर्वी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या विषयी मनसे कार्यकर्ता विजय खरपास याने सोशल मीडियावर 'कमळीबाई' असा उल्लेख केला होता. यावरुन श्वेता महाले यांचे चुलत भाऊ शिवराज महाले पाटील यांनी विजय खारपास यांना एका ठिकाणी बोलविले होते. त्याठिकाणी शिवराज महाले यांनी विजय खरपास यांना मारहाण केली.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चिखली मध्ये चर्चांना उधाण आले आले. या मारहाणीमध्ये विजय खरपास यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना औरंगाबाद (Aurangabad)येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवराज महाले-पाटील आणि त्यांच्या तीन ते साथीदारांवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) दुपारी चिखली शहरांमधून महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली. आमदार श्वेता महाले यांच्यासह अनेक महिला लोकप्रतिनिधी, विविध पक्षांच्या व सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मात्र करोना प्रोटोकॉलचा आधार घेत चिखली पोलिसांनी या रॅलीला परवानगी नसल्याचे सांगत रॅलीत सहभागी झालेल्या महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT