Chandrakant Patil Sarkarnama
विदर्भ

Chandrakant Patil म्हणाले, अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाबाबत आता माघार नाही...

Politics : अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाला केवळ राजकारणाचा भाग म्हणून विरोध करू नये.

सम्राट कदम

Chandrakant Patil News : एका गल्लीत चार-चार गणपती हवेत, मात्र त्यांचा शास्त्रीय अभ्यासक्रम का नको? अथर्वशीर्षाचा अभ्यासक्रम हा पूर्णतः ऐच्छिक असून, त्याला विरोध का? केवळ राजकारण (Politics) म्हणून विरोध नको, जर कुणाला काही नवे अभ्यासक्रम द्यायचे असतील तर द्यावे, पण अथर्वशीर्षावरून आता माघार नाही, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित इंडियन जिओटेक्निकल सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सीओईपीचे कुलगुरू प्रा. मुकुल सुतावणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे आदी उपस्थित होते. भौतिक प्रगती बरोबरच आध्यात्मिक शांतता महत्वाची असल्याचे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, भारताचा (India) आध्यात्मिक वारसा हा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय असून, नवतंत्रज्ञानाबरोबरच तो ही नव्या शैक्षणिक धोरणाचा आत्मा आहे.

अथर्वशीर्ष अभ्यासक्रम हा शास्त्रीय अध्ययनाचा भाग असून, त्याला केवळ राजकारणाचा भाग म्हणून विरोध करू नये. पूर्णतः ऐच्छिक असलेला हा अभ्यासक्रम निःशुल्क असून, आमच्या आवडीच्या गोष्टी आम्हाला शिकायचा अधिकार आहे. विरोधकांनाही कोणता नवीन विषय शिकायचा असेल. तर त्यांनीही सविस्तर अभ्यास करून तो विद्यापीठाकडे द्यावा. नवीन सूचनांचे स्वागत आहे. आंदोलन झाले म्हणून अभ्यासक्रम मागे घ्यायची काही गरज नाही, नव्या सूचना स्वीकारा पण अभ्यासक्रम बंद करू नका, असा सल्ला पाटील यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT