BJP  Sarkarnama
विदर्भ

BJP Setback : भाजपला धक्का! माजी नगरसेवक हद्दपार; राजकीय वर्तुळात खळबळ

Chandrapur BJP Leader Ajay Sarkar Exiled : चंद्रपुरातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये सुरू असलेल्या धुसफुशी दरम्यान जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई करत भाजपचे माजी नगरसेवक अजय सरकार हद्दपार केले आहे.

Aslam Shanedivan

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वादाची धार अद्याप कमी झालेली नाही. नुकताच ग्रामीण जिल्हा कमिटी स्थगित करण्यात आल्यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावरून मुनगंटीवार यांनी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.

यानंतर मुनगंटीवार यांनाच भाजपमधून धक्का दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. अशातच आता पुन्हा एकदा मुनगंटीवार यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी नगरसेवक अजय सरकार यांच्यावर जिल्हा प्रशासनाने हद्दपारीची कारवाई केली आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या मोठ्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

सरकार यांच्यावर जिल्हा प्रशासनाने केलेली हद्दपारीची कारवाई ही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. तर सरकार यांना तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. सरकार यांच्याविरोधात यापूर्वीही हद्दपारीची कारवाई झाली होती.

सरकार यांच्यावर तब्बल 17 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. ज्यापैकी 8 प्रकरणांत त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तर 9 प्रकरणे ही न्यायप्रविष्ट आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने त्यांची बाजू ऐकून घेत त्यांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार केले आहे. तर त्यांच्यावर दोन वर्षांच्या प्रस्तावित हद्दपारीचा प्रस्ताव होता.

अजय सरकार हे आमदार किशोर जोरगेवार यांचे कट्टर विरोधक मानले जातात. जोरगेवार यांनीच मनपा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापल्याचे समोर आले होते. ज्यानंतर सरकार यांनी जोरगेवार यांच्यावर गंभीर आरोप करत थेट इशारा दिला होता. तर सरकार हे भाजप नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. दरम्यान आता सरकार यांच्यावर झालेली हद्दपारीची कारवाई ही मुनगंटीवार यांना धक्का मानला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT