Balu Dhanorkar, Vijay Wadettiwar and Sudhar Adbale Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Lok Sabha Election : बाळू धानोरकरांना तिकीट कसं मिळवून दिलंत ? अडबालेंनासुद्धा…

Vijay Wadettiwar : गेले 30 ते 35 वर्षांत मी राजकारणात सक्रिय आहे. मी कधी जातीय द्वेष केलेला नाही. ज्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत, त्या काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Chandrapur Lok Sabha Election : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपने सुधीर मुनगंटीवार या बलाढ्य नेत्याला उमेदवारी दिली. काँग्रेसचे अजूनही काही ठरलेले नाही. उमेदवारीचा घोळ अजूनही सुरू आहे. राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुलगी शिवानी यांच्यासाठी तिकीट मागितलं आहे. 2019मध्ये दिवंगत बाळू धानोरकर यांनाही तिकीट मिळवून आणलं आणि त्यांना निवडूनही आणलं. एवढेच नव्हे तर शिक्षक आमदार आमदार सुधाकर अडबाले यांनाही तिकीट मिळवून दिलं असल्याचं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे.

चंद्रपूरमध्ये कॉंग्रेसच्या तिकिटासाठी ‘उंदीर-मांजराचा खेळ’ सुरू असल्याची परिस्थिती आहे. वडेट्टीवार आणि धानोरकरांचे समर्थकांचा सोशल मीडियावर वॉर सुरू झाला आहे. जुन्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. अशा परिस्थितीत विजय वडेट्टीवार यांनी आज (ता 23) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये जात-पात कधी पाहिली जात नाही. राजकारण करताना अशा पद्धतीने आमच्या विचारधारेने काही स्वार्थी, मतलबी लोक विषारी विचार पेरत असतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेले 30 ते 35 वर्षांत मी राजकारणात सक्रिय आहे. मी कधी जातीय द्वेष केलेला नाही. ज्या काही पोस्ट व्हायरल होत आहेत, त्या काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी करत आहेत. पाच -दहा लोकांचं हे टोळकं आहे. ते हे धंदे करत असतात. बाळू धानोरकरांना तिकीट कशी मिळवून दिली, हे सगळ्या लोकांना माहिती आहे. अडबालेंच्या संदर्भात मी स्वतः पुढाकार घेऊन त्यांची तिकीट कापली गेली असतानाही मिळवून दिल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

समाजातील अनेक नेत्यांचे मान्यवरांचे मला फोन येत आहेत. एक टोळकं विषारी जातीय द्वेष पसरवत आहे. मी कुठल्याही समाजाचा, कधीही द्वेष केलेला नाही. बहुजन समाजातील छोटा कार्यकर्ता असा द्वेष करून कधीही मोठा होऊ शकत नाही. तिकीट कोणाला द्यायचे, हा निर्णय घेण्याचा अधिकार हा हायकमांडचा आहे. मी माझ्या मुलीसाठी तिकीट मागितली त्यात दोष काय? मी अनेकांचे नाव सुचवले आहे, असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेले नाही. याबाबत विचारले असता, उद्यापर्यंत तिकीट वाटप जाहीर होईल आणि चंद्रपूरसाठी मला हायकमांडने विरोध केलेला नाही, असे सांगताना भाजप नेते, माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यावरही वडेट्टीवारांनी टीका केली. फाटली चाटली घातली, असे शब्द वापरणे हे त्यांच्या संस्कृतीत बसते का, हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. आशिष देशमुख 2019मध्ये कोणाचे तिकीट मागण्यासाठी आले होते, याचे उत्तर जर त्यांनीच दिलं तर योग्य होईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT