Chandrapur Mayor Election  Sarkarnama
विदर्भ

Chandrapur mayor election : वडेट्टीवार-धानोरकरांमधील वाद कायम असतानाच आज महापौरांचे नामांकन, चंद्रपुरात नेमकं काय होणार?

Chandrapur Mayor Nomination : शिवसेनेच्या नेत्यांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे काँग्रेसमधील वाद अद्याप संपुष्टात आलेला नाही. महापौर पदाची निवडणूक १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत अनेक वेगवान राजकीय घडामोडी पडद्याआड घडण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Chandrapur News, 05 Feb : खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील वादावर दिल्लीत तोडगा निघाल्याची चर्चा असतानाच आज रात्री उशिरापर्यंत गट नेत्यांवर एकमत झाले नव्हते. दरम्यान, आज महापौर पदाचे नामांकन दाखल होणार आहे.

त्यामुळे खासदार धानोरकर, आमदार वडेट्टीवार या दोन्ही गटांसह भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही महापौर पदासाठी नामांकन दाखल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत खासदार धानोरकर आणि आमदार वडेट्टीवार गटाला अडीच-अडीच वर्षे महापौर पद, स्थायी समिती मित्र पक्षाला आणि गटनेता प्रदेश काँग्रेस ठरविणार, असा निर्णय झाल्याचे समजते.

मात्र, गटनेत्याच्या नावावर विजय वडेट्टीवार सहमत नसल्याचे समजते. त्यामुळे या दोघांमधील वाद अद्याप संपुष्टात आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, धानोरकर गटातर्फे आज महापौर पदासाठी माजी महापौर संगीता अमृतकर, वैशाली महाडोळे, संगीता भोयर आणि सुनंदा धोबे हे नामांकन अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

तर वडेट्टीवार गटाकडून चंदा वैरागडे किंवा संजीवनी वासेकर यापैकी एक जण महापौर पदासाठी दावा करू शकतात. भाजपातर्फे संगीता खांडेकर महापौर पदासाठी, तर राहुल पावडे यांचा उपमहापौर पदासाठीही दावा होऊ शकतो. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनस्वी गिऱ्हे महापौर पदासाठी नामांकन अर्ज दाखल करू शकतात.

शिवसेनेच्या नेत्यांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे काँग्रेसमधील वाद अद्याप संपुष्टात आलेला नाही. महापौर पदाची निवडणूक १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. तोपर्यंत अनेक वेगवान राजकीय घडामोडी पडद्याआड घडण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडीसाठी महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नागपूर विभागीय आयुक्तांनी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार, निर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात होणार आहे. या निवडीसाठी ४ फेब्रुवारीपर्यंत विविध पक्षांकडून एकूण ३६ नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली आहे.

यात भारतीय जनता पक्ष १८ अर्ज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १० अर्ज, भारतीय शेतकरी कामगार पक्ष ४ अर्ज आणि अपक्षांच्या ४ अर्जांचा समावेश आहे. नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चालणार आहे. हे अर्ज मनपा प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील नगरसचिव यांच्या कक्षात विहित नमुन्यात स्वीकारले जातील.

नामनिर्देशनासोबत आधार कार्डची सत्यप्रत, निवडणूक ओळखपत्राची सत्यप्रत किंवा जमा केल्याची पोच, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र (किंवा ते सादर केल्याची पोचपावती), जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्यांत सादर करण्याचे हमीपत्र (आवश्यक असल्यास) ही कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT