Congress corporators associated with Vijay Wadettiwar arriving at the Nagpur Bench of Bombay High Court after filing a petition against the divisional commissioner over Chandrapur Municipal Corporation group registration. Sarkarnama
विदर्भ

Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांच्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांच्या विरोधात हायकोर्टात धाव, चंद्रपूर महापालिकेत मोठा उलटफेर होणार?

Chandrapur Municipal Corporation : विजय वडेट्टीवार समर्थक काँग्रेस नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांविरोधात हायकोर्टात धाव घेतल्याने चंद्रपूर महापालिकेतील मतदान व महापौर निवडणुकीत मोठा उलटफेर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : नागपूर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थक नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या 18 नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी केली. मात्र त्यांना मतदानासाठी आवश्यक असेलेला फॉर्म क्रमांक दिला जात नाही तसेच निवडून आल्याच्या प्रमाणपत्राची मागणी केली जात असल्याच आरोप याचिकेच्या माध्यमातून केला जात आहे. या याचिकेवर तडकाफडकी सुनावणी झाली नाही तर काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना मतदानापासून मुकावे लागले आणि चंद्रपूर महापालिकेत मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे एकूण 27 नगरसेवक निवडून आले आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या 13 समर्थक नगरसेवकांची आधीच नोंदणी केली आहे. गटनेत्याचे नावही निश्चित केले आहे. त्यानंतर वडेट्टीवार यांच्या 18 समर्थकांनी मंगळवारी गटनोंदणी केली. आपल्याकडे सर्वाधिक नगरसेवक आहे. आमचा गट खरा आहे आणि गटनेताही आपल्याच गटाचा होणार असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता.

आमच्या गटात नगरसेवकांची संख्या अधिक आहे त्यामुळे आमच्या गटाला मान्यता द्यावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. नव्या नियमानुसार जोपर्यंत विभागीय आयुक्तांकडे फॉर्म क्रमांक तीन भरला जात नाही तोपर्यंत नगरसेवकांनी मतदानाचा अधिकार मिळत नाही. त्यासाठी एक प्रतिज्ञापत्र द्यावे लागले. मात्र विभागीय आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या दबावात आहे. त्यामुळे आयुक्तांनी फॉर्म क्रमांक तीन भरू दिला नाही असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.

गट स्थापन करण्यासाठी कोणाचा सल्ला घेण्याची गरज नाही. प्रमाणपत्राची गरज नाही. निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे गॅझेटमध्ये नोंदवल्या जातात. ती तपासून विभागीय आयुक्तांना नोंद करून घ्यायची आहे. एवढेच त्यांचे काम आहे. मात्र विभागीय आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर झाल्यासारखे वागत आहे. आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आयुक्तांचा आहे. या विरोधात कायदेशीर लढाई आम्ही लढू.

आमच्या नगरसेवकांना मतदानापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास विभागीय आयुक्तालयात ठाण मांडून बसण्याचा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला होता. आज विजय वडेट्टीवार यांच्या समर्थक नगरसेवकांना आयुक्तांच्या भूमिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली आहे. आता न्यायालय काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ही याचिका रेंगळल्यास चंद्रपूर महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसची मोठी अडचण होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT