Chandrapur News Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar News : थोरल्या साहेबांचे 'निष्ठावंत' दीड महिन्यातच अजितदादांकडे

NCP News : राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही चंद्रपूर जिल्ह्याला फारसे कधीच गांर्भार्याने घेतले नाही.

प्रमोद काकडे

Chandrapur News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर आम्ही मोठ्या साहेबांसोबतच राहू, असा ठातीछोकपणे दावा करणारे चंद्रपूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजीव कक्कड आणि कार्याध्यक्ष नितीन भटाकर यांनी अवघ्या दीड महिन्यातच पलटी मारली आहे. या दोघांनाही नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला. या दोघांनाही जिल्ह्यातील पदाधिकारी आपल्या सोबत असल्याचा दावा केला. दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांना या दोघांचाही प्रवेश फुसका बार ठरला, अशी टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) स्थापनेपासून हे पदाधिकारी होते. मात्र, जिल्ह्यातील पक्षांची आजवरची स्थिती बघता घड्याळ्याचे काटे कधीच पुढे सरकले नाहीत. पक्षस्थापेनापासूनची तर आजतागायत पक्षाची चंद्रपूर जिल्ह्यातील स्थिती जैसे थे आहे. जे काही जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक निवडून आले ते स्वबळावर जिंकले. या काळात पदाधिकारी आले आणि गेले. मात्र, पक्ष वाढीसाठी कोणताही फायदा झाला नाही.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही चंद्रपूर जिल्ह्याला फारसे कधीच गांर्भार्याने घेतले नाही. या काळात राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठे नेते जिल्ह्यात येवून गेले. त्यांना पक्षातील अंतर्गत वादाशिवाय दुसरे काहीच बघायला मिळाले नाही. दरम्यान, पक्षात फूट पडली. अजित पवार सत्तेत सामील झाले. त्यावेळी उपरोक्त दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपण शरद पवार यांच्या सोबत आहेत. त्यांना सोडून जाण्याचा विचार सुद्दा करणार नाही, असे जाहीर केले होते.

मात्र, दीड महिन्याच्या आतच कार्यकर्त्यांची कामे होत नाही, असे त्यांच्या लक्षात आले. जिल्ह्याच्या 'विकासा'ला हातभार लावण्यासाठी त्यांनी धाकट्या पवारांची घड्याळ हाताला बांधल्याचे सांगितले जात आहे. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत या दोघांनी प्रवेश घेतला.

अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश घेताच कक्कड यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या शहर अध्यक्षपदी आणि भटारकर यांची चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या दोघांनाही मोठया संख्येत पदाधिकारी आपल्या सोबत आल्याचा दावा केला. मात्र, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांना या दोघांच्याही जाण्यामुळे नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल. त्यामुळे पक्ष वाढेल, असा दावा केला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT