Chandrapur Shivsena UBT Vikrant Sahare Sarkarnama
विदर्भ

Video Shivsena UBT : पोलिसांची मोठी कारवाई! ठाकरे गटातील जिल्हाप्रमुखाच्या घरात सापडला 'एवढ्या' काडतुसांचा साठा

Jagdish Patil

Chandrapur News, 03 August : शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाच्या घरामध्ये मोठा काडतुसांचा साठा सापडल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे आता एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये जवळपास 40 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

विक्रांत सहारे (Vikrant Sahare) असं या ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुखाचं नाव आहे. चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागातील घरामध्ये पोलिसांनी शोध अभियान राबवलं होतं. या कारवाईदरम्यान ही काडतुसे सापडली आहेत.

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गोळीबारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अग्निशस्त्र व हत्यार विरोधी विशेष अभियान सुरु केलं आहे. याच अभियानांतर्गत इंदिरानगर भागातील युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या घरी शोधमोहीम राबवली असता त्यामध्ये एकूण 40 काडतुसे सापडली.

सहारे यांना शस्त्रे विकण्यासाठी काही माणसं येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना (Police) मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सहारे यांच्या घरावर धाड घातली. या धाडीत 40 काडतुसे, 1 मक्झिन आणि तलवार देखील जप्त करण्यात आली आहे.

या घटनेनंतर आता पोलिसांकडून विक्रांत सहारे यांची चौकशी केली सुरु आहे. तर स्वतः पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन प्रकरणाची माहिती घेतली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात काडतुसे सापल्याच्या घटनेमुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT