Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काय कारेमोरेजी... तुमच्या चेहऱ्यावर काही भाव दिसत नाहीये !

आता या धान व तांदूळ घोटाळ्यात भंडारा जिल्ह्यातील मोठे नेते अडकणार याची खात्रीच बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) कार्यकर्ता मेळाव्यात दिली.

Abhijit Ghormare_Guest

भंडारा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भंडाऱ्यात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात धान घोटाळ्याबाबत एक वक्तव्य केले. त्यांचे हे विधान मोठे राजकीय उलथापालथ करणारे ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याचे नाव भर सभेत मिश्‍कील भाषेत त्यांनी घेतल्याने ‘तो’ नेता खरोखरच अडचणीत येईल का, याविषयी विविध चर्चांना उधाण आले आहे.

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील धान घोटाळ्याच्या चौकशीत ‘त्या’ मोठ्या नेत्याचे नाव समोर आणणार, असा इशाराच जणू त्यांनी दिला आहे. त्यामुळे भंडारा जळीत प्रकरणात जिल्हा रुग्णालयाला भेट देण्यासाठी आलेले तेव्हाचे विरोधी पक्ष नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ‘भंडारा धान घोटाळ्यात एका मोठ्या पक्षाचे नेते जेलमध्ये जाणार’, असे वक्तव्य केले होते. बावनकुळेंनी फडणवीसांच्या त्या वक्तव्याची आठवण आज करवून दिली. आता या धान व तांदूळ घोटाळ्यात भंडारा जिल्ह्यातील मोठे नेते अडकणार याची खात्रीच बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) कार्यकर्त्या मेळाव्यात दिली.

नान पटोलेंना पराभूत करण्याचा चंग..

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भंडाऱ्यात भाजप मेळाव्याला हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषणात विरोधी पक्ष त्यातल्या त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निवडणुकीत हरविण्याचा आपण चंग बांधला असल्याच्या उल्लेख केला. यावेळी त्यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याच्या उल्लेख करत भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याचे कंबरडे मोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान त्यांनी भंडारा जिल्ह्यात धान घोटाळा व तांदूळ घोटाळ्याच्या उल्लेख केला असून आपले सरकार हे खपवून घेणार नाही, असा सूचक इशारा दिला.

काय कारेमोरे जी..

धान घोटाळ्याबाबत बोलताना त्यांनी चक्क ‘काय कारेमोरेजी... तुमच्या चेहऱ्यावर आज काही दिसत नाहीये...’ असा उल्लेख अचानक केल्याने सभेत स्मशान शांतता पसरली होती. विशेष म्हणजे भंडाऱ्यातील एका मोठ्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा भर सभेत मिश्‍कील भाषेत अप्रत्यक्ष उल्लेख केल्याने या धान घोटाळ्याच्या चौकशीत त्या नेत्याचे नाव समोर तर येणार नाही, असा प्रश्‍न सभागृहात चर्चिला गेला.

दरम्यान भंडारा जिल्ह्यात रुग्णालय जळीत प्रकरणात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्यातील झालेल्या धान घोटाळ्यात अनेक मोठे नेते जेलमध्ये जाणार असा सूचक इशारा दिला होता. त्याची आता तो इशारा खरा ठरण्याची वेळ आली आहे, अशीही चर्चा होत आहे. विशेष म्हणजे नुकतेच गोंदिया जिल्ह्यात धान घोटाळ्यात एका वर्ग १ व इतर वर्ग २ च्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या वर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे धान व तांदूळ घोटाळा आगामी काळात अनेक लोकांचा बळी घेणार, असे सुतोवाच बावनकुळेंनी आजच्या भाषणात केल्याची चर्चा भंडाऱ्यात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT