Rahul Gandhi-Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Bavankule Challenge: काँग्रेसला आणखी एक संधी! बावनकुळेंनी दिलं खुलं आव्हान; म्हणाले, महापालिका निवडणुका जिंकून...

Bavankule Challenge to Rahul Gandhi: देशात भाजपविरोधी वातावरण असतानाही सातत्यानं आमचा पराभव होत असल्याचा दावा करत लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला आहे.

Amit Ujagare

नागपूर : सातत्याने पराभव होत असल्याने काँग्रेसचे नेते राहूल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करीत आहेत, मतचोरी झाल्याचा दावा ते करत आहेत. त्यांच्याकडं आता कुठलाच मुद्दा शिल्लक राहिलेला नाही, असं असलं तरी काँग्रेस पक्षाला आणखी एक संधी आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी मतदार याद्यांवर आक्षेप घ्यावा, त्या तपासून घ्याव्यात आणि जिंकून दाखवावं अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला खुलं आव्हान दिलं आहे. तसंच यावेळी त्यांनी पराभूत झाल्यावर पुन्हा तेच आरोप करू नयेत असा सल्लाही दिला आहे.

कुठलीही निवडणूक लढण्यापूर्वी सर्व काळजी घ्यायची असते, मतदार याद्या तपासाव्या लागतात. शंका असेल तिथे आक्षेप घ्यावे लागतात. निवडणूक आयोगामार्फत सर्वच राजकीय पक्षांना आक्षेप घेण्यासाठी संधी दिली जाते. प्रत्येक पक्षाला सूचनाही देऊन कळविले जाते. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस कुठलाच आक्षेप नोंदवला नाही. पराभूत झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यानंतर त्यांना मतदार याद्यांमध्ये घोळा कसा काय दिसायला लागला? असा सवाल बावनकुळे यांनी विचारला आहे.

काँग्रेस मूर्खासारखी आरोप करत आहे. मतदार यादीचं सर्वेक्षण नेहमीच सुरू असतं, त्यामुळं रोज नवे मतदार समाविष्ट होत असतात, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मतदारयादीत कुणाचंही नाव समाविष्ट झालं किंवा नाही याची खबरदारी राजकीय पक्षांनाच घ्यावी लागते असं सांगून जेव्हा नेतृत्व क्षमता संपते तेव्हा दुसऱ्यावर आरोप करून आपली चमडी वाचविण्याचं काम केलं जातं असा आरोपही बावनकुळेंनी काँग्रेस नेत्यांवर केला.

ईव्हीएम काँग्रेसच्या कार्यकाळातच तयार झालं, तेव्हा केंद्रात मनमोहन सिंग यांचं सरकार होतं. ईव्हीएमद्वारे काँग्रेसनं निवडणुकासुद्धा जिंकल्या आहेत. आता पाठोपाठ पराभवाचे धक्का बसत असल्यानं त्यांना ईव्हीएम सदोष वाटू लागले आहेत. पक्ष वाढवण्यासाठी जनतेची नस ओळखावी लागते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

राहुल गांधींनी भाजप महायुतीनं महाराष्ट्राची विधानसभा चोरली असा आरोप केला तेव्हा चंद्रशेखर बावनकुळेंच्या कामठी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख आपल्या लेखात केला होता. मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील कामगारांना मतदार करण्यात आलं असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यावेळीसुद्धा बावनकुळे यांनी कामठी येऊन निवडणूक जिंकून दाखवा असं आव्हान राहुल गांधींना दिलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT