Nagpur News: मराठा समाजासाठी काढण्यात आलेला जीआर रद्द करावा यासाठी काँग्रेसच्यावीतने 10 ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतरही काँग्रेस मोर्चावर ठाम आहे. हे बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विदर्भात हाच मुद्दा गाजणार असल्याचे दिसून येते. त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे 27 टक्के आरक्षण रद्द झाले होते. भाजप महायुतीमुळे ते पुन्हा मिळाले. भाजप हाच खरा ओबीसीचा हितचिंतक आहे असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. राज्यात सर्वत्र पूरपरिस्थिती आहे. अशा परिस्थिती राजकारण सोडून सर्वांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकत्र यावे आणि मोर्चा रद्द करावा असे आवाहनही बावनकुळे यांनी केले आहे.
2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे 27 टक्के आरक्षण रद्द झाले होते. त्या विरोधात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केले होते. त्या वेळी आघाडी सरकारने आमच्याविरुद्ध आकसापोटी गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाने आज आम्हाला निर्दोष मुक्त केले असून हा न्यायाचा विजय आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे काम केले. महाविकास आघाडी सरकारने ते उध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. महायुती सरकार सत्तेत आले नसते, तर सुप्रीम कोर्टात ओबीसीची बाजू कोणी मांडली नसती. आज ओबीसींना जो न्याय मिळाला आहे, तो भाजपच्या सरकारमुळेच मिळाला आहे.
राज्यातील ओबीसी आणि मराठा समाजांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे म्हणाले, ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर येणार नाहीत याची काळजी सर्वांनी घ्यायला हवी. कोणत्याही समाजाच्या हक्कावर गदा येऊ नये, मराठा असो की ओबीसी आंदोलक असो, दोघांनीही संयम बाळगावा.
महसूलमंत्री म्हणूनच नव्हे, तर ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष म्हणूनही मी आवाहन करतो. दोन्ही समाजात भाऊबंदकी टिकली पाहिजे. पूरग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. अशा काळात दोन समाजांना समोरासमोर आणणे योग्य नाही. वडेट्टीवार यांनी मोर्चा मागे घ्यावा. सध्या शेतकऱ्यांना मदत करणे हीच खरी काळाची गरज असल्याचे बावनकुळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.