Chandrashekhar Bawankule and Dr. Ashish Deshmukh Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule News : आशिष देशमुख यांच्या भेटीबाबत बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं !

Chandrashekhar Bawankule - Ashish Deshmukh: कुठल्याही गोष्टीची मर्यादा असते, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

सरकारनामा ब्यूरो

Nagpur News: आमच्या नेतृत्वावर रोज खालच्या भाषेत टीका केली जात आहे. ४८ तासांत मातोश्रीवर येण्याचे आव्हान दिले होते. मी आजही सांगतो की, असंतोष वाढत आहे. ते चिथावणी देत आहेत. कुठल्याही गोष्टीची मर्यादा असते, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे सांगताना अजित पवारांवर अविश्वास का दाखवला जातो, असा प्रश्‍न करीत अजित पवार पक्ष सोडण्याच्या भूमिकेत नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात सांगितले. (Why is Ajit Pawar distrusted?)

डॉ. आशिष देशमुख यांनी आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात विचारले असता, मतदारसंघात विकास कामे करून घेण्यासाठी आशिष देशमुख यांनी माझी भेट घेतली. यामध्ये त्यांच्या भाजप प्रवेशाचा किंवा अन्य कुठल्या राजकारणाचा काही भाग नाही, असे बावनकुळेंनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांच्यात नेतृत्वाचा अभाव आहे. संधी मिळाली होती, पण त्या संधीचं सोनं करण्याऐवजी त्यांनी माती केली. त्यांच्या काळात चार हजार कोटी कंपन्यांनी खाऊन टाकले. आता शिंदे सरकारने जनतेला मदत दिली आहे. खोटं बोल, पण रेटून बोल, अशी उद्धव ठाकरे यांची अवस्था आहे.

संजय राऊत कशाला तुम्ही कशाला चॅलेंज करत आहे? मोदी नावाचे वादळ येणार म्हणजे येणार, हे नक्की. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असे भाषणात सांगता. सभेत फटाके फोडण्याऐवजी ते पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर, हा विचार मग ते का नाही करत. ५० लाख रुपयांचे फटाके फोडले, याच त्यांच्या संवेदना आहेत का? फटाके न फोडता ते पैसे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी देता आले असते. उद्या काही पक्ष प्रवेश आहेत आणि बाजार समितीच्या निवडणुका झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होतील, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नव्हते. त्यामुळे सर्व रान मोकळं होत. त्यामुळे उद्धव ठाकरे सरस दिसत आहेत. संजय राऊतांना ज्या सवयी लागल्या आहेत, त्याप्रमाणे ते बोलत आहेत. आमच्या रक्तात धोका देणे नाही, पाठीत खंजीर खुपसणे, हे आमच्या नाही तर त्यांच्या रक्तात आहे, असा घणाघात आमदार बावनकुळेंनी केला.

मुख्यमंत्री (Chief Minister) बदलले जातील, अशा अफवा संजय राऊत (Sanjay Raut) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) पसरवल्या जात आहेत. संजय राऊतांनी आधी शिवसेनेचे (Shivsena) वाटोळे केले, आता ते महाविकास आघाडीचे वाटोळे करतील. संजय राऊत स्वतः कधी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक आले नाहीत. त्यामुळे ते काय बोलतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही. भाजपसाठी सत्ता हे समाजसेवेचे माध्यम आहे. मात्र, उद्धव ठाकरे फटाके फोडत दिवाळी साजरी करत आहे, असे ते म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT