Chandrashekhar Bawankule and Sanjay Raut. Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule News : संजय राऊतांनी कधीतरी चांगले बोलावे, त्यांचं ऐकलं जाईल !

Maharashtra : महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित असलेले विकासाचे राजकारण व्हावे.

सरकारनामा ब्यूरो

Bawankule on Sanjay Raut : भविष्यातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्यासाठी तयारी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर भाजपचे ३० कार्यकर्ते पक्षाला बळकट करतील, असे नियोजन करण्यात आले आहे. पक्षात नवनवीन कार्यकर्त्यांना एकत्र करून महाराष्ट्रात पक्ष एक नंबर करण्याचा प्रयत्न करण्याचा निश्चय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. (There should be politics of development)

नागपूर विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी मिळो, अशी सदिच्छा व्यक्त करताना ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला अपेक्षित असलेले विकासाचे राजकारण व्हावे. महाराष्ट्रात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदत करावी अशी विनंती केली आहे.

यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना दुपटीने मदत केली आहे व पुढेही मदत केली जाईल. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंचनामे लांबले होते, आता मात्र ते वेगाने होतील. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार सक्षम आहे, असा विश्वास व्यक्त केला. फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा दिला जाईल आणि हे आम्हीच करू शकतो, असा विश्‍वास शेतकऱ्यांना असल्याचेही ते म्हणाले.

संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी कधीतरी सरकारला चांगले सल्ले द्यावे, कधीतरी चांगले बोलले पाहिजे, चांगल्या सूचना दिल्या तर सरकार त्यांचे म्हणणे ऐकेल असे मत मांडले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते, कधीच मदत मिळाली नाही, असा हल्लाबोल केला.

शेतकऱ्यासाठी या सरकारने खूप काही केलं आहे, कुठल्याही सरकारने तेवढं केलं नाही, विरोधकांनी शेतकऱ्यांसाठी (Farmers) काही करायचं नाही आणि आणि आरोप करायचे, मात्र त्यांनी आपला पूर्व इतिहास बघितला पाहिजे, विरोधकांनी टीका करण्यापेक्षा आपला चेहरा आरशात बघितला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी या सरकारने (State Government) चांगल्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत लवकरच मिळेल, असे आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT