Rahul Gandhi, Supriya Sule, Aditya Thackeray and Chandrashekhar Bawankule. Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule News : त्यांना देशाची नाही, तर मुलाबाळांची चिंता; त्यासाठीच आज पाटण्यातील बैठक !

सरकारनामा ब्यूरो

Prime Minister is working to elevate India : एकीकडे आपले पंतप्रधान भारताला उंची देण्यासाठी काम करत आहेत, तर दुसरीकडे विरोधक पाटण्यात एकत्र येत आहेत. कशासाठी? तर देशासाठी नाही, त्यांच्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. (Chandrasekhar Bawankule hit the opponents hard)

आज (ता. २३) नागपुरात पत्रकारांशी बोलताना आमदार बावनकुळे म्हणाले, पाटण्यामध्ये आज विरोधकांची एकत्रित बैठक आहे. या बैठकीचा उद्देश म्हणजे सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचं आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना पुढे करायचं आहे. तर उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरेंची चिंता आहे. त्यांच्या मुलाबाळांची चिंता करण्यासाठी एकत्रीकरण सुरू आहे.

विरोधकांनी कितीही वज्रमूठ बांधली तरीही मोदी जगातले सर्वोत्कृष्ट प्रशासक म्हणून समोर आले आहेत. २०२४ मध्ये एनडीए ४००च्या पार झाल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद मोदींच्या नेतृत्वात तयार झाली आहे. विरोधकांची पुढची पिढी धोक्यात आली आहे. म्हणून त्यांना वाटतं की आम्ही आज एकत्र आलो नाही, तर आमचं सर्वकाही उद्ध्वस्त होईल आणि त्यांचे गैरव्यवहार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाहीत, असं बावनकुळे म्हणाले.

मोदीच अमेरिकेनं ज्या पध्दतीने त्यांना सलामी दिली त्यांचं स्वागत केले याचा देशाच्या १४० कोटी जनतेला अभिमान आहे. मोदींबद्दल ज्यांचे मनभेद आहेत आणि मोदी ज्यांना नकोच आहेत. त्यांनी असले काहीही धंदे केले, तरीही ते शून्य झाल्याशिवाय राहणार नाही. २०२४मध्ये मोदी पुन्हा आले, तर आपला सुपडा साफ होईल आणि राज्यात असलेली पदेही निघून जातील, या भीतीपोटी ते एकत्र येत असल्याचेही ते म्हणाले.

ज्यांना महाराष्ट्र (Maharashtra) सांभाळता आला नाही, ते दिल्ली काय सांभाळणार? महाराष्ट्रात सत्तेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेत (Municipal Corporation) भ्रष्टाचार केला. कोविड घोटाळ्यासह येवढे काळे धंदे करून ठेवले आहे की, आता महाराष्ट्राची जनता त्यांना साथ देणारं नाही. अशा बोलघेवड्या लोकांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT