Chandrashekhar Bawankule Sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule : युतीचं गणित सुटलं? कुठे मैत्री अन् कुठे 'फाईट'; बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं!

Chandrashekhar Bawankule clarifies the Mahayuti alliance equation : महायुतीमधील युतीचं गणित नेमकं काय? कुठे मैत्री आणि कुठे फाईट यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट भूमिका मांडली.

Rajesh Charpe

महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. नगरपालिकेमध्ये झालेला जागा वाटपावरून झालेला गोंधळ टाळण्यासाठी यावेळी महायुती एकत्र लढणार असल्याचे तीनही पक्षाच्या प्रमुखांनी जाहीर केले आहे. मात्र आता कोणाला किती जागा सोडायचा याचा पेच निर्माण होणार आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेव्हा जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार होईल तेव्हा सर्वांनाच आनंद होईल असा दावा केला. सोबतच त्यांनी जिथे भाजप मजबूत तिथे आम्हाला, शिवसेना मजबूत तिथे शिवसेनेला युती करण्याचे अधिकार देण्याचा वरिष्ठ पातळीवर झाला असल्याचे सांगितले. हे बघता नागपूरसह विदर्भात शिवसेनेची युती होण्याची शक्यता दिसत नाही.

नागपूर महापालिकेत भाजपचे १०८ तर शिवसेनेचे फक्त दोन नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेचे आता दोन तुकडे झाले आहेत. दोन्ही माजी नगरसेवक उद्धव ठाकरे सेनेत आहे. शिंदे सेनेकडे एकही नगरसेवक नाही. बावनकुळे यांनी सांगितलेल्या निर्णयानुसार नागपूरमध्ये भाजप चांगलीच मजबूत आहे. चार विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत. दीडशे जागांसाठी सुमारे तीन हजार कार्यकर्त्यांनी अर्ज केले आहेत. कार्यकर्त्यांची समजूत काढताना भाजपला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

शिवसेनेसाठी जागा सोडायलाही भाजपकडे जागा नाही. ही राजकीय परिस्थिती बघता नागपूरमध्ये शिवसेनेला स्वबळावर लढावे लागू शकते.पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिवसेना युतीत लढणार आहे. राज्यामध्ये काही ठिकाणी महायुती अपडेट होते आहे. भाजप शिवसेनेचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आम्ही इतर १६ पक्षांसोबत आम्ही बोलणी करणार आहोत.

आमच्याकडे युवा स्वाभिमान हा पंधरा वर्षापासून महायुतीचा भाग आहे. आमदार रवी राणा यांनी अनेक वेळा भाजपाला पाठिंबा दिला. स्वाभिमानी अमरावतीत महायुतीमध्ये राहणार आहे. अमित शहा मुंबई घशात घालणार असल्याचा आरोप आता उद्धव सेनेकडून सुरू झाला आहे. निवडणूक आल्यावरच त्यांना मुंबई आठवते. त्यांच्याकडे बोलायला काही मुद्दे नाहीत.

विकसित मुंबईचा प्लॅन माहिती नाही. विकासाचा कुठलाच अजेंडा नाही. सकाळी झोपेतून उठल्यापासून त्यांचा टोमणे मारायचा कार्यक्रम सुरू होतो. जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रापासून मुंबईला कोणीही वेगळे करणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मात्र दिवसभर टीव्हीवर दिसले पाहिजे, फेसबुकवर कॉमेंट केल्या पाहिजे यासाठी उद्धव ठाकरे असे आरोप नेहमीच करीत असल्याला टोमणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी मारला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT