Chandrashekhar Bawankule Sanjay Raut  sarkarnama
विदर्भ

Chandrashekhar Bawankule News: 'फडणवीसांसाठी 'वर्षा'च नाही, तर प्रत्येक बंगला...'; संजय राऊतांची शंका बावनकुळेंनी मिटवली

Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut : शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर अनेक ठिकाणी लिंबू बांधले असल्याची टीका केली होती. या दाव्या-प्रतिदाव्यांना संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा सुरुवात झाली आहे.

Rajesh Charpe

Vidarbha News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरतात. त्यांना कशाची भीती वाटते अशी विचारणा करून उद्धव ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी काळ्या जादूकडे लक्ष वेधले होते. सध्या काळ्या जादूची चांगलीच चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी फडणवीस यांच्यासाठी अशुभ असे काहीच नाही, असे सांगून विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पाच वर्षे वर्षा बंगल्यावर मुक्कामी होते. त्यांच्याकरिता प्रत्येकच बंगला शुभ आहे. अशुभ असा कुठलाच बंगला नसून ते लवकरच तेथे मुक्कामी जाणार असल्याचा दावा केला. दरम्यान, संजय राऊतांच्या वक्तव्याला उत्तर देताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेच्या नेत्यांना काळ्या जादूविषयी जास्त माहिती असल्याचा टोला लगावला.

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर अनेक ठिकाणी लिंबू बांधले असल्याची टीका केली होती. या दाव्या-प्रतिदाव्यांना संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सुमारे दोन महिन्यांचा कार्यकाळ उलटला आहे. ते अद्यापही वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत हे विशेष.

व्यस्ततेमुळे शिंदे अनुपस्थित

एकनाथ शिंदे यांच्या बैठकीतील अनुपस्थितीवरही बावनकुळे यांनी आपले मत व्यक्त केले. एखाद्या बैठकीला मुख्यमंत्री तर एखाद्या दुसऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री उपस्थित असतात. उपमुख्यमंत्र्यांनी सर्वच बैठकांना उपस्थित राहावे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र राहावे असे कुठे काही लिहले नाही.

एकनाथ शिंदे यांच्याकडे चार चार विभाग आहेत. माझ्याकडे देखील दोन जिल्ह्याचा पालकमंत्रीपद आहेत. कामाच्या व्यापामुळे प्रत्येक बैठकीला हजर राहता येत नाही. मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी राहावेच असे काही नाही, असाही खुलासा बावनकुळे यांनी केला.

प्रत्येक गळाभेट राजकीय नसते...

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी घेतलेल्या गळाभेटीमागे काही शोधण्याची वा तर्क लावण्याची गरज नाही. गळाभेट ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पटोले आणि एकत्र आलो तर आम्हीसुद्धा गळा भेट घेऊ. कोराडीची जगदंबा देवी माझी आणि पटोले यांची कुलदैवत आहे. येथे दर्शनाच्या निमित्ताने आमची भेट होत असते. राजकारण आपल्या जागी आहे असेही बावनकुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT