Local Body Elections : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीने महाराष्ट्रात सत्तासुद्धा स्थापन केली आहे. शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुखाचा संसारही सुरू झाला आहे. त्यामुळे महायुती महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही एकत्रित लढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महूसलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, महायुतीने एकत्रित लढायचे की स्वबळावर याचा निर्णय जिल्हाध्यक्षांना घ्यायचा आहे. ते जे ठरवतील त्याला भाजपचा पाठिंबा राहील. कोणावरही महायुतीचा निर्णय लादणार नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
नागपूर, मुंबईसह अनेक शहरातील महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. सुमारे तीन वर्षांपासून महापालिकेत प्रशासक आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे. जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाची यावर अंतिम सुनावणी होणार आहे. त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पुन्हा महायुतीचे सरकार असल्याने भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सोबत लढणार की स्वतंत्रपणे याबत चर्चा झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत जागवाटपावरून मोठी रस्खीखेच महायुतीत झाली होती. अनेकांना विश्रांती द्यावी लागली. महापालिकेत मात्र कोणी थांबणार नाही. मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. हे बघता भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली नसल्याचे दिसते. हा निर्णय स्थानिक पातळवर होईल हे बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.
नागपूर शहरात महापालिकेच्या 150 जागा आहेत. यापूर्वी झालेल्या निवडणुकीत 108 नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. हे बघता नागपूरमध्ये महायुती कायम राहिल्यास मोठ्या प्रमाणात जागेसाठी रस्सीखेच होऊ शकते. त्या तुलनेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची येथे फारशी ताकद नाही. हे बघता नागपूरमध्ये महायुती कायम राहण्याची शक्यता धुसर आहे. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण तसेच मराठवाड्यात राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे जिल्हानिहाय महायुती तसेच स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय होईल असे दिसते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.