Bacchu Kadu Sarkarnama
विदर्भ

Chandur Bazar APMC Result : बच्चू कडूंनी बबलू देशमुखांना खातेही उघडू दिले नाही, एकहाती आणली सत्ता !

Bablu Deshmukh : ज्येष्ठ नेते बबलू देशमुख यांनी कंबर कसली होती.

सरकारनामा ब्यूरो

Amravati District's Chandur Bazar APMC Election Result News : अमरावती जिल्ह्यातील महत्वाची चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता आणण्यासाठी सहकार क्षेत्रात मातब्बर समजले जाणारे ज्येष्ठ नेते बबलू देशमुख यांनी कंबर कसली होती. पण माजी राज्यमंत्री, आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’समोर त्याचा टिकाव लागू शकला नाही. (He could not sustain it in front of 'Prahar')

बच्चू कडूंच्या झंझावाताने शेतकरी पॅनलने एकहाती सत्ता मिळवली. १८ पैकी १६ जागा जिंकून बच्चू कडूंनी विरोधकांना धूळ चारली आणि आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. दोन अपक्षांनी या निवडणुकीमध्ये बाजी मारली. मात्र बबलू देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलने खातेही उघडले नाही.

अडते व व्यापारी मतदार संघातून मनोज नांगलिया, अमोल लंगोटे या दोन अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. हमाल व मापारी मतदार संघातून लतीफखान कादरखान, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून रामदास भोजने, मनोज वाटाणे, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून प्रमोद वाकोडे, सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघातून संदीप चरपे, माधव धोंडे, आश्विन भेटाळू, सतीश मोहोड, राजेन्द्र यावूल, विनोद राऊत, नंदकिशोर वासनकर निवडून आले.

सेवा सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघातून मिना संदीप देशमुख, ललिता पोहोकार, सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदार संघातून गजेंद्र गायकी, सेवा सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून अनिल खैरकार विजयी झाले. बच्चू कडूंच्या (Bacchu Kadu) मतदारसंघात इतर कुणाला एंट्री नाही, हेच या निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे.

या निवडणुकीमध्ये (APMC Election) निवडणूक निरीक्षण अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार प्रथमेश मोहोळ, निवडणूक (Election) निर्णय अधिकारी आर.एन. मदारे, तर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रमोद वर्धेकर यांनी काम पाहिले. एपीआय प्रमोद राऊत यांनी आपल्या टीम सह कडक पोलीस (Police) बंदोबस्त लावला होता.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT