Tekchand Sawar and Vikas Kumbhare Sarkarnama
विदर्भ

Cheating With MLAs of Nagpur: आमदार कुंभारेंना भोजन व्यवस्थेसाठी, तर आमदार सावरकरांना मागितले मंत्रिपदासाठी पैसे !

Tekchand Sawar and Vikas Kumbhare: आमदारांना शंका आल्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

सरकारनामा ब्यूरो

Cheating with MLAs of Nagpur : आमदारांना मंत्रिपदाचे आमिष देऊन कोट्यवधी रुपयांची मागणी करणाऱ्या भामट्याला नागपूर पोलिसांनी गुजरातमधील मोरबीमधून अटक केली आहे. त्याने ज्यांना पैसे मागितले होते, त्यामध्ये नागपुरातील दोन आमदारांचा समावेश आहे. (Two MLAs from Nagpur are included)

नागपुरातील आमदार विकास कुंभारे आणि कामठीचे आमदार टेकचंद सावरकर हे ते दोन आमदार आहेत. आमदारांना शंका आल्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यासंदर्भात दोन्ही आमदारांनी आज (ता. १७) स्वतः माध्यमांना माहिती दिली. आमदार कुंभारे म्हणाले, गेल्या ५ मेपासून त्या व्यक्तीचे सातत्याने फोन येत होते. तो म्हणाला, ‘जे. पी. नड्डा के पीए बोल रहे है, दोहपर को देड से दो बजे के बीज नड्डाजी आपको फोन करने वाले है’, असे त्याने सांगितले.

पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचाच कॉल आला. ‘नड्डा साहाब आपसे बात करना चाहते है’, असं तो व्यक्ती म्हणाला. त्यानंतर पुन्हा एक व्यक्ती बोलला. तो म्हणाले, ‘हमारे पीए ने एक कार्यक्रम गुजरात मे आयोजित किया है, वहां के भोजन की व्यवस्था आपको करनी है. दुसऱ्या दिवशी पुन्हा पीएचा फोन आला. तो म्हणाला, १ लाख ६७ हजाराचे जेवणाचे बिल येणार आहे. पैसे ऑनलाइन पाठवा. ही बनवाबनवी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तात्काळ पिएला सांगून पोलिसांत तक्रार दाखल केली, असे आमदार कुंभारे म्हणाले.

असाच किस्सा आमदार टेकचंद सावरकर यांच्यासोबतही घडला. ते म्हणाले, त्या व्यक्तीने जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या आवाजात बोलून सांगितले की, तुम्हाला महाराष्ट्राच्या (Maharashtra) मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. ही गोष्ट तुम्ही कुणालाही सांगू नका. त्यानंतर पुन्हा दोन वेळा त्याच व्यक्तीचा कॉल आला आणि तुम्ही मंत्री बनण्यासाठी किती पैसे देऊ शकता, असे त्याने विचारले. तेव्हाच माझ्या लक्षात आले की ही काहीतरी बनवाबनवी आहे.

यासंदर्भात पोलिस (Police) निरीक्षक विनोद पाटील म्हणाले, आमदार विकास कुंभारे यांना ५ मे ते १६ मेच्या दरम्यान त्या व्यक्तीचे फोन आले. त्याने पैशाची मागणी केली. त्यांचे स्वीय साहाय्यक राजेश बहारदरे यांनी काल तहसील पोलिस स्टेशनला तक्रार दिली. गुजरातमध्ये एका कार्यक्रमासाठी १ लाख ६७ हजार रुपये ऑनलाइन पाठवा, असे त्या व्यक्तीने सांगितले होते.

आमदारांना शंका आल्यामुळे त्यांनी पिएला तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केला. त्याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. त्याचं नाव अद्याप माहिती झालं नाही. आमची टीम गुजरातला (Gujrat) गेली आहे. पुढील तपास क्राईम ब्रांच करणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT