सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे राज्य शासनाकडून अवमान करण्याचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान भाजप व शिवप्रेमी कधीच सहन करणार नाही. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ मातृतीर्थ सिंदखेड राजा ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ल्यापर्यंत रॅली काढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
विनोद वाघ यांनी सांगितले म्हणाले की, राज्यामध्ये ज्या-ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची स्थापना करण्यात आली, त्या त्या ठिकाणचे पुतळे हटवण्याची प्रक्रिया राज्य शासनाकडून (Maharashtra Government) व स्थानिक प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या विरोधात शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे. अमरावती (Amravati) असेल किंवा जालना (Jalna) जिल्ह्यातील शेवली या ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे शासनाकडून हटविण्यात आले आहेत. त्या ठिकाणच्या शिवप्रेमींच्या मनामध्ये प्रशासन व राज्य शासन विरोधी भावना निर्माण झाली आहे.
राज्य शासनाने शिवभक्तांच्या भावनांचा आदर करून छत्रपतींचे पुतळे त्याच ठिकाणी सन्मानाने बसवावे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. त्यासाठीच मातृतिर्थ सिंदखेड राजा ते शिवनेरी किल्ल्यापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये हजारो शिवभक्तांनी सहभागी होण्याचे आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले होते. या रॅलीच्या माध्यमातून राज्य शासनाला जागे करण्याचे काम करण्यात येणार आहे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये शिवभक्त कोणताही अपमान सहन करणार नाही. यासाठी मातृतीर्थ ते शिवनेरी या रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी विनोद वाघ यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.